मुंबई

"गर्दी झाली तर सुनावणी घेणार नाही", सुनावणीदरम्यानच्या गर्दीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची नाराजी

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 1 : उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान झालेल्या गर्दीमुळे आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. जर अशी गर्दी झाली तर सुनावणी घेणार नाही, असा इशाराही खंडपीठाने दिला.

यापूर्वी मागील आठवड्यात अन्य एका न्यायमूर्तींनी ही गर्दीमुळे सुनावणी न घेण्याचा इशारा दिला होता. आज न्या एस एस शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठाने ही याबाबत नाराजी व्यक्त केली. सुनावणी साठी न्यायालयात पोलिस, वकील आणि अन्य पक्षकारांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती. यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. अमरावतीमध्ये साठ वकिल पॉझिटिव्ह झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

आपण काळजी घेत आहोत. पण सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क घाला, असे न्यायालयाने सांगितले. पुन्हा आपल्याला ऑनलाईन सुनावणीसाठी जावे लागणार नाही याची खबरदारी घ्या, असे न्या शिंदे म्हणाले. तसेच न्यायालयातील पोलिस, वकिल आणि पक्षकारांना न्यायालयाबाहेर प्रतिक्षा करण्याच्या सूचना दिल्या.

न्या. गौतम पटेल यांनीही परिपत्रक काढून गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. तर वकिलाने सुनावणी दरम्यान मास्क घातला नाही म्हणून न्या. प्रुथ्वीराज चव्हाण यांनी सुनावणी घेण्यास नकार दिला होता. मुंबई सह राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा वाढू लागला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे तेथील न्यायालयीन कामकाजाची वेळ मर्यादित केली आहे. 

लॉकडाऊन कालावधीमध्ये ऑनलाईन न्यायालये सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये कामकाज पूर्ववत करण्यास प्रारंभ झाला आहे. 

bench of mumbai high court bench unhappy over crowd during hearing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT