मुंबई

सर्वात मोठा तस्कर NCB च्या गळाला, सोबत सापडलं ड्रग्सचं घबाड; लोखंडवाला, वर्सोवामध्ये धडक कारवाई

अनिश पाटील

मुंबई : केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) गुरुवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत मुंबईतील परदेशी ड्रग्जच्या सर्वात मोठ्या सप्लायरlला अटक केली आहे. अटक झालेला आरोपी ड्रग्ज तस्कर फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्याच्याकडून एनसीबीने तब्बल 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. शादाब बटाटा हा गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई आणि देशभरातल्या ड्रग्जच्या व्यवसायाशी संबंधित होता. तसेच, बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत होता, असे देखील समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बॉलिवुडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. यामध्ये अभिनेता अर्जुन रामपालची देखील याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाचे धागेदोरे अनेक सेलिब्रिटींच्या दारापर्यंत पोहोचायला लागल्यापासून एनसीबीनं अधिक खोलात तपास सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एनसीबीनं गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये फारूकचा मुलगा शादाब एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड या भागांमध्ये मारलेल्या छाप्यामध्ये 2 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज सापडले आहे. त्यासोबतच, काही महागड्या कार देखील हस्तगत केल्या. याशिवाय छाप्यामध्ये एक नोटा मोजण्याचे मशिन देखील सापडले आहे. सोबतच फारूख बटाटा एलएसडी, गांजा, बड आणि कोकेनसारखे ड्रग्ज देखील पुरवायाचा अशी माहिती एनसीबीला मिळाली आहे.

यामध्ये दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाण याच्या डोंगरी आणि नागपाडा भागातल्या ठिकाणांवर एनसीबीने छापे मारले. याआधी 7 मार्च रोजी एनसीबीने गोव्यामध्ये छापा टाकला होता. या छाप्यामध्ये एनसीबीने हेमंत साह उर्फ महाराजला अटक केली होती.

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी अनुज केसवानी आणि रीगल महाकाल यांच्याकडून महाराजबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा मारून त्याला अटक करण्यात आली आहे. 

mumbai news biggest raid by NCB farrukh batata contained by officers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT