मुंबई

...तर मुंबईतील लग्न सोहळ्यांमध्ये निमंत्रणाशिवाय धडकेल BMC पथक

दीनानाथ परब

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा करोना व्हायरसने डोकं वर काढलं आहे. करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. करोनाचा हा फैलाव  रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने अनेक पावलं उचलली आहेत. बाहेर विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु आहेच. पण त्याचबरोबर आता लग्न समारंभारतही मुंबई महापालिकेचं पथक अचानक धडकू शकतं. करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्नसोहळ्यांवर मुंबई महापालिकेची करडी नजर असेल. अशा लग्नसोहळ्यांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई होऊ शकते. 

"आम्हाला सुद्धा भव्य भारतीय विवाहसोहळे आवडतात. तुम्ही सर्व करोना नियमांचे पालन करत असाल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. 'सुरक्षितता' हीच नवविवाहित जोडप्यासाठी उत्तम भेट आहे, ही भेट देणं तुम्हाला जमत नसेल, तर मुंबईच्या सुरक्षेसाठी विनानिमंत्रण आम्ही तिथे पोहोचू शकतो" असं सूचक इशारा देणारं टि्वट मुंबई महापालिकेने मंगळवारी केलं.

फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी राज्यात ८,७४४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. २२ रुग्णांचा मृत्यू झाला. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत १,०१४ करोना रुग्णांची नोंद झाली व चार रुग्णांचा मृत्यू झाला. सलग सहाव्यादिवशी मुंबई १ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली. देशात अॅक्टिव्ह करोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रतील करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. 

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रशासनाने पुन्हा काही प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आला. ठाण्यातही हॉटस्पॉट असलेल्या काही भागांमध्ये १३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीसाठी लॉकडाउन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

मुंबईत कुठेही लॉकडाउन लावण्यात आलेला नाही. महापालिका करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आपल्या पातळीवर पावलं उचलत आहे. प्रशासनाकडून मुंबईकरांना करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

mumbai news BMC on increased number of corona and strict code of conducts for weddings

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT