मुंबई

हापूस आंब्यासाठी थेट निर्णयात बदल, APMC मधील बदललेल्या महत्त्वाच्या निर्णयाची रविवारपासून अंमलबजावणी

सुजित गायकवाड

नवी मुंबई, तुर्भे : : दर रविवारी बाजार समितीला कार्यालयीन सुट्टी असते. त्यानुसार बाजार समितीच्या आवारातील पाचही बाजार या दिवशी बंद असतात; मात्र आता हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होत आहे. रविवारीही आंब्याच्या गाड्या बाजारात येत असतात. बाजार आवर बंद असल्याने या गाड्या बाजाराच्या बाहेर उभ्या कराव्या लागतात; मात्र आता फळांवरील नियमन हटवल्याने हा आंबा थेट मुंबईच्या किरकोळ बाजारात जाऊ शकतो. यामुळे बाजार समितीला मिळणारा सेसही बुडत असतो. परिणामी यापुढे दर रविवारी अर्धा दिवस बाजार सुरू राहणार आहे. बाजार समितीने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. 

कृषी कायद्यात बदल होत असल्याने बाजारात व्यापार करण्याच्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी बाजार समितीनेही आपल्या नियमात बदल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दर रविवारी फळबाजार आवर सुरू ठेवला जाणार आहे. बाजारात येणाऱ्या मालावरील सेस मिळावा तसेच सेस वसुलीसाठी कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे. तशा सूचना व्यापारी संघटना आणि व्यापाऱ्यांना बाजार समितीने दिल्या आहेत. त्यामुळे आता रविवारी बाजार समिती सुरू राहणार आहे. रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

आंब्याच्या हंगामात व्यापाऱ्यांना चांगला व्यापार करता येतो आणि या बाजारामुळे बाजार समितीलाही चांगला महसूल मिळतो; मात्र आता बाजार समितीच्या आवारात कृषिमाल न आणता थेट किरकोळ बाजारात विकण्याची मुभा सरकारने दिल्याने बाजार समितीमध्ये येणारा बहुतांशी कृषिमाल थेट किरकोळ बाजारात जात असतो. आता आंब्याच्या बाबतीत हेच झाल्यास आंब्याचा बाजारातील व्यापार कमी होऊ शकतो. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार रविवारीही बाजार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 - ईश्‍वर मेश्राम, सहसचिव, फळ बाजार  

mumbai news change in the rule of APMC specially for alphonso mangoes

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT