Mumbai Transgender Protest Sakal
मुंबई

Mumbai News : महिला किंवा पुरुष पोलिसांनी हात लावू नये; तृतीयपंथीयांचा गोंधळ, पोलिसांसमोर पेच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट टाळल्याने तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत.

वैष्णवी कारंजकर

पोलीस भरती तसंच आपल्या हक्कांच्या मागणीसाठी आज तृतीयपंथीयांनी मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याने तृतीयपंथीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र पोलीस संकटात सापडले आहेत.

तृतीयपंथी नागरिक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेणार होते. मात्र मुख्यमंत्री सह्याद्री अतिथी गृहामध्ये बैठका करत असल्याने त्यांनी वेळ दिली नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांनी गोंधळ केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्नही केला.

परंतु, आपल्याला ताब्यात घेण्यासाठी महिला किंवा पुरुष नाही तर तृतीयपंथी पोलीस आणा, अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली. त्यामुळे आता पोलिसांसमोर पेच उभा राहिला आहे.

काय आहेत तृतीयपंथीयांच्या मागण्या?

  • तृतीयपंथीयांना पोलीस भरतीमध्ये विशेष भरती म्हणून सामावून घ्यावे

  • तृतीयपंथीयांना शैक्षणिक आरक्षण द्यावे

  • अनुदानित संस्था व शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घ्यावे.

यासह आणखी काही मागण्या आणि हक्कांसाठी त्यांनी मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणीही केली होती. मात्र ही मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मंत्रालयासमोर भीक मागून त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : डोंगरशेळकीत ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT