मुंबई

हायकमांडकडून आदेश आला, दिल्लीत लागली बैठक; उद्या बदलला जाणार महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ?

सुमित बागुल

मुंबई : राज्यातील काँग्रेस नेत्यांना उद्या दिल्लीत बोलावलं आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या बातम्या गेल्या महिन्याभरापासून समोर येतायत. बाळासाहेब थोरात यांच्याऐवजी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील बोललं जात आहे. अशात उद्या महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना हायकमांडने दिल्लीत बैठकीसाठी बोलावलं आहे. उद्याच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे.

या सोबतच दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूनमीवर काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.  शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नक्की कशा प्रकारे रणनीती राबवायची यावरही उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजतंय.

याआधी काँग्रेसकडून राज्यभरात शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम राबवली गेलेली. केंद्राला शेतकऱ्यांच्या सह्या असलेली पत्र देखील पाठवण्यात आली होती. त्यामुळे उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत प्रामुख्याने या दोन विषयांवर  चर्चा होणार असल्याचं समजतंय.

उद्या पार पडणाऱ्या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातील मंत्री आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.  

mumbai news congress political news leaders of maharashtra to have meeting with high command at delhi

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT