ED raid  Team eSakal
मुंबई

Mumbai News : जंबो कोवीड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीची 8 ठिकाणी छापेमारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीने मुंबई परिसरात बुधवारी आठ ठिकाणी छापेमारी केली.जंबो कोविड सेंटरशी संबंधित कंत्राटदारांच्या कार्यालयांवर निवासस्थानांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई उपनगरातील विलेपार्ले येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर आणि इतर मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहे.

या व्यावसायिकाला जंबो कोविड सेंटरचे एक कंत्राट मिळाले होते.यापूर्वी, ईडीने या प्रकरणात 15 मालमत्तांची झडती घेतली होती. ज्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पक्तर, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले पक्षाचे पदाधिकारी सूरज चव्हाण आणि आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांचा समावेश आहे.

लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि बीएमसीने महामारीच्या काळात जारी केलेल्या विविध निविदांविरुद्धच्या प्रकरणाची चौकशी करताना, ईडीने बीएमसी आयुक्तांना पत्र लिहून निविदा प्रक्रियेची माहिती मागवली होती.

यापूर्वीची कारवाई

कथित जंबो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाईचा बुधवारी 21 जूनला मुंबई शहरात ईडीने तब्बल 15 ठिकाणी छापे टाकले. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या जवळचे असलेले सुजित पाटकर यांच्याही घरी ईडीचे पथक धडकले होते. लाइफलाइन रुग्णालयाशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले.पाटकर यांच्यासह ठाकरे गटाचे आणखी एक पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ठिकाणीही ईडीने छापे टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT