Mumbai News 
मुंबई

Mumbai News : धोकादायक इमारती खाली करा अन्यथा...; मंडळाकडून कठोर पाऊले उचलली जाणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पावसाळ्यापूर्वी म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. यंदाच्या वर्षी जाहीर केलेल्या यादीत मुंबईत १५ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले होते.

या इमारतीतील नागरिकांनी कार्यवाहीला सहकार्य करावे असे आवाहन म्हाडाने केले आहे. मात्र, ज्या इमारतीतील नागरिकांनी अद्याप घरे खाली केली नाहीत त्या पोलीस बळाचा वापर करून खाली करून घेण्यात येतील असे म्हाडाने सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पाऊले उचलली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात येते. यंदाचे वर्षी १५ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या १५ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ७ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींमध्ये ४२४ निवासी व १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी आणि भाडेकरू वास्तव्यास होते.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही नुसार १५५ निवासी भाडेकरू आणि रहिवाशांनी स्वतःच्या निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर इतर रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार आहे.

यापैकी १९७ नागरिकांनी अद्याप नोटिशीला सहकार्य केले नसल्याची माहिती मंडळाने दिली आहे. काही इमारतींची दुरुस्ती ई विभाग अंतर्गत करण्यात येते आहे. तर उर्वरित इमारती खाली होताच त्याचे पाडकाम हाती घेण्यात येईल.

धोकादायक इमारती

एकूण इमारती १५

खाली झालेल्या इमारती ६

पाडकाम पूर्ण २

पाडकाम सुरु ४

पावसाळ्यापूर्वीच नागरिकांना इमारत धोकादायक झाली असल्याबाबत नोटीसही देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी अनेकांनी नोटिशीला सहकार्य करत इमारती खाली केल्या. मात्र अनेकांनी अद्याप नोटिशीला सहकार्य केले नाही. पावसाचा जोर वाढतो आहे आणि अशावेळी नागरिकांची सुरक्षितता याला मंडळाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे ही घरे खाली करण्यासाठी आता पोलीस बळाचा वापर करण्यात येईल.

- अरुण डोंगरे, मुख्याधिकारी, इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत वाहतुकीस अडथळा आणणार नाही, मराठ्यांनी कसं केलं नियोजन, सरकारही फेल

भरसभेत पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ; मोहम्मद रिझवींनी वापरले अपशब्द, भाजपची काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका

Lionel Messi Retirement: लिओनेल मेस्सीचे निवृत्तीचे संकेत! घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार, संपूर्ण परिवार उपस्थित राहणार

Pune News : पुण्यात कॅबचालकांसाठी 'अभय' योजना सुरू; प्रवांशांकडून वाढीव शुल्क आकारणाऱ्यांवर कारवाई नाहीच

हुंड्यामुळे दर 24 तासांनी 20 महिलांचा मृत्यू! निक्की भाटीच्या मृत्यूने उलघडले गूढ; NCRB च्या आकडेवारीतून भयानक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT