मुंबई

समीर देसाई यांच्यानंतर दुसरा 'मोहरा' शिवसेनेत; गोरेगाव जिंकण्यासाठी सेनेची जोरदार फिल्डिंग

कृष्ण जोशी

मुंबई, ता. 16 : गोरेगावात शिवसेनेने आपली अवस्था सुधारण्यासाठी मुस्लिम कार्यकर्त्यांना वाजतगाजत पक्षात प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले आहे. मात्र या अशा नाटकांना जनता भुलणार नाही, अशी टीका भाजपने केली आहे.

माजी नगरसेवक हनीफ मलबारी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना नुकताच गोरेगावात वाजतगाजत प्रवेश देण्यात आला. नंतरही त्याचे फलक गोरेगावात अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. माजी नगरसेवक समीर देसाई यांच्यानंतर हा दुसरा मोहरा शिवसेनेत घेऊन हा मतदारसंघ भाजपकडून पुन्हा हिसकावून घेण्याचा चंगच सुभाष देसाई यांनी बांधल्याचे यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया शिवसैनिक यानिमित्ताने करीत होते. 

शिवसेना पक्ष जात-पात मानत नसुन प्रामाणिक निष्ठेने सामाजिक कार्य करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्याला कुठलाही भेदभाव न करता संधी देते, असे यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. शिवसेनेत आलेल्या मुस्लिम बांधवांना पक्षात मानसन्मान, सच्चे प्रेम, व भाईचारा मिळेल, अशी ग्वाही देताना यापूर्वी स्व. बाळासाहेब ठाकरे व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मुस्लिमांचे प्रश्न सोडविल्याचे दाखलेही त्यांनी दिले. तर मलबारी यांनीही मुस्लिम समाज येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत राहील, असे आश्वासन दिले.  

तर सर्वच समाजघटकांमधील शिवसेनेचे स्थान डळमळीत झाले असून सर्वत्र त्यांच्या पायाखालील जमीन सरकत चालली आहे. त्यामुळे शिवसेना कधी गुजराती मतदारांना साद घालते तर कधी मुस्लिमांचे लांगूलचालन करते, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. मात्र अशा नाटकांना मुंबईकर भुलणार नाहीत, कारण नागरी सोयी व महापालिकेतील भ्रष्टाचार हे महापालिका निवडणुकीत प्रमुख मुद्दे राहतील. अशा युक्त्या वापरून मुळ मुद्दे नजरेआड करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली.

mumbai news ex corporator hanif malbari joined shivsena befor upcoming mumbai municipal corporation election

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT