Artificial rain sakal
मुंबई

Mumbai News : दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग

मुंबईतील वायू आणि धूळ प्रदूषणाला मुंबईत बाहेरून येणाऱ्या २० हजार चारचाकी आणि अवजड वाहनांचाही हातभार लागतो.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दिल्लीत मुंबईपेक्षाही जास्त प्रदूषण आहे. मात्र त्यांनी केलेल्या उपाययोजनेचा अभ्यास मुंबई महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत. दिल्लीतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईही कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल. त्यामुळे धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेला पाण्याच्या टॅंकरवर येत असलेला खर्च वाचवता येणार आहे, असे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी यांनी स्पष्ट केले आहे.

पालिका मुख्यालयात दिवाळीनिमित्त माध्यमांशी पालिका आयुक्त संवाद साधत होते. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अश्विनी भिडे, सह आयुक्त मिलिन सावंत, सह आयुक्त सुनील धामणे, प्रमुख जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

आयुक्त चहल पुढे म्हणाले की, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 2009 मध्ये कमी पाऊस पडला होता. पालिकेने ८ कोटी रुपये खर्चून तलाव परिसरात ढगांवर विमानाने रसासनांची फवारणी करून 'कृत्रिम पाऊस' पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुर्दैवाने तो प्रयोग यशस्वी झाला नाही असेही आयुक्त चहल म्हणाले.

मुंबईसह राज्यातील पुणे व अन्य शहरांमध्येही हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी राज्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची महत्वाची बैठक घेऊन प्रदूषण व उपाययोजना याबाबत आढावा घेतला. त्यावेळी मुंबई महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती देण्यात आली, असे आयुक्तांनी सांगितले. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी महापलिकेने विविध उपाययोजना केल्याने गेल्या तीन दिवसांत पुणे, नाशिक आदी शहरांच्या तुलनेत मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यात यश मिळाले आहे, असा दावा आयुक्त इकबाल चहल यांनी यावेळी केला.

डंपिंग ग्राऊंडवरील आगी रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांची फौज

मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजनांच्या अंतर्गत आता कांजूरमार्ग आणि देवनार डंपिंग ग्राऊंडवर वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी २४ तास लक्ष ठेवण्यासाठी ५०० सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली आहे.

मुंबईच्या वेशीवर बाहेरील वाहनांची धुलाई

मुंबईतील वायू आणि धूळ प्रदूषणाला मुंबईत बाहेरून येणाऱ्या २० हजार चारचाकी आणि अवजड वाहनांचाही हातभार लागतो. त्यामुळे या वाहनांसोबत मुंबईत धूळ येऊ नये यासाठी मुंबईचे प्रवेशद्वारे असलेल्या दहिसर, मुलुंड व वाशीनाका या ठिकाणी वाहनांची वाहतूक न थांबवता धावत्या वाहनांची हायजेट प्रेशर मशिनद्वारे धुलाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांद्वारे निर्माण होणाऱ्या प्रदूषणापासून दिलासा मिळणार आहे, असे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले.

तळोजा येथील केमिकल कंपन्या रडारवर

मुंबईत इमारत बांधकामांमुळे आणि वाहनांमधील इंधनामुळे वायू प्रदूषणाला हातभार लागत आहे. त्याचप्रमाणे मुंबई शेजारील तळोजा परिसरात असलेल्या केमिकल कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या धुरामुळेही मुंबईतील प्रदूषण वाढत आहे का ? याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. आकाशमार्गे धुळीचे, वायूचे प्रदूषण एका ठिकाणाहून बाजूच्या ठिकाणी पसरण्यास फारसा वेळ लागत नाही. जर सदर केमिकल कंपन्यांमुळे प्रदूषण वाढत असेल तर त्या ५० टक्के कंपन्या तूर्तास बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर

Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Education: दिशाभूल करणाऱ्या शाळांना बसणार चाप; शालेय शिक्षण विभागाची नवी नियमावली, नेमके कसे आहेत बदल?

SCROLL FOR NEXT