मुंबई

SPECIAL REPORT : 'अग्निपरीक्षे'त 36 रुग्णालये नापास; मुंबईत अनधिकृत रुग्णालयांचा सुळसुळाट

विनोद राऊत

मुंबई, ता. 17 : भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर अग्निशमन दलाकडून मुंबईतील सर्व शासकीय व खासगी रुग्णालये, नर्सिंग होमची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान मुंबईतील जवळपास 36 खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, मॅटर्निटी होम्स अनधिकृपणे सुरू असल्याचे उघडकीस आले. या रुग्णालयांकडे महाराष्ट्र नर्सिंग ऍक्‍टनुसार कुठलीही नोंदणी परवाना नसल्याचे निदर्शनास आले. या रुग्णालयांना तातडीने बंद करण्याच्या नोटिसा अग्निशमन दलाने बजावल्या आहेत. 

भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत 11 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. अग्निशमन दलाने मुंबईतील रुग्णालयांची तपासणी केली असता धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. पालिकेकडे नोंद असलेल्या अनेक रुग्णालयांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा केवळ नावालाच आहे. अनेक नर्सिंग होम्स, मॅटर्निटी होम्सकडे महाराष्ट्र नर्सिंग ऍक्‍टनुसार नोंदणी केली नसल्याचेही समोर आले आहे. अशा प्रकारे मुंबईतील 36 मोठी रुग्णालये अनधिकृतपणे सुरू असून त्यांना रीतसर नोटिसा देऊन कारवाई करण्याच्या शिफारशी करण्यात आल्या आहे.

यामध्ये मानखुर्द, गोवंडी परिसरातील सर्वाधिक 13 रुग्णालयांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ वडाळा परिसरातील आठ, विक्रोळी, चेंबूरमधील प्रत्येकी तीन; तर कांदिवली, चिंचोली परिसरातील प्रत्येकी तीन रुग्णालयांचा समावेश आहे.

या रुग्णालयांना तातडीने बंद करण्याच्या नोटिसा अग्निशमन दलाने संबंधित प्रभागातील आरोग्य अधिकारी, पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी आणि संबंधित पोलिस ठाण्याला या प्रकरणी अहवाल पाठवण्यात आले आहेत; मात्र यापैकी अनेक रुग्णालये अद्यापि सुरूच असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे काही दिवसांनंतर पुन्हा एकदा आढावा घेऊन या रुग्णालयांचे वीज, पाणी तोडण्याची तयारी अग्निशमन दलाने केली आहे.  

मुंबईतील विभागनिहान अनधिकृत रुग्णालये 

  • मानखुर्द-13 
  • भायखळा- 1 
  • मेमनवाडा- 1 
  • मरोळ- 1 
  • वडाळा- 7 
  • विक्रोळी- 3 
  • चेंबूर- 3 
  • कांदिवली- 2 
  • चिंचोली- 3 
  • कुर्ला- 2 

 नियमावली शिथिल करण्याची मागणी 

अग्निशमन दलाच्या कारवाईनंतर नर्सिंग होम, रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे दाद मागितली. अग्निशमन दलाच्या अटी-शर्ती पाळणे कठीण आहे. त्यामुळे या नियमावली शिथिल करण्याची मागणी या प्रतिनिधींनी केली; मात्र आयुक्तांनी त्यांची मागणी धुडकावत अग्निसुरक्षेचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. 

दीड हजार रुग्णालयांची तपासणी 

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेंतर्गत मुंबईतील दीड हजाराहून अधिक खासगी रुग्णालये, मॅटर्निटी होम्स, नर्सिंग होम्सची तपासणी करण्यात आली. या रुग्णालयांकडे अग्निसुरक्षेसह अन्य परवानाविषयक कागदपत्रांची मागणी केली असता जवळपास 36 रुग्णालयांकडे नोंदणी परवानाच नसल्याचे निदर्शनास आले. मुंबईतील झोपडपट्टी-गल्लीबोळात अशा प्रकारचे हजारो अनधिकृत रुग्णालये असून, तिथे जाणेही शक्‍य नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या रुग्णालयांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

अग्निशमन दलाच्या तपासणी मोहिमेनंतर या रुग्णालयांचा पालिकेने आढावा घेतला आहे. या रुग्णालयांना कागदपत्रांची पूर्तता करण्याची मुदत दिली आहे. निश्‍चित कालावधीत त्यांनी कागदपत्रांची प्रक्रिया न केल्यास ती बंद करण्याची कारवाई पालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून संयुक्तरीत्या करण्यात येईल असं मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

तर राज्य  अग्निशमन सेवा माजी संचालक एम. व्ही. देशमुख म्हणालेत की, नर्सिंग होम, मॅटर्निटी होम, डे-केअर सेंटरच्या बाबतीत राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. वैद्यकीय सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून नियमावली निश्‍चित करावी.

mumbai news fire brigade audit of hospital many hospitals do not have official permission to run hospital


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup 2025 Prize Money : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाला किती कोटींचं बक्षीस मिळणार? ICC ने केलीय मोठी घोषणा

SSC HSC Exam Time Table : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात हजर; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोप

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : भारतीय निवडणूक आयोगाने मोकामा हत्याकांड प्रकरणाबाबत डीजीपींकडून अहवाल मागितला

SCROLL FOR NEXT