मुंबई

NIA ने केलेली अटक बेकायदेशी म्हणत सचिन वाझे यांनी दाखल केली हेबिअस कॉपर्स याचिका

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 15 : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात हेबिअस कॉपर्स याचिका दाखल केली आहे. एनआयएने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा वाझे यांनी केला आहे. वाझे यांना शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे. त्याआधी त्यांची तब्बल तेरा तास चौकशी केली होती. वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने तातडीने जामीन देण्यासाठी नकार दिला असून पुढील सुनावणी ता. 19 रोजी ठेवली आहे.  मात्र त्याआधी त्यांना एनआयएने अटक केली. वाझे यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहे, त्यामुळे त्यांची चौकशी व्हायला हवी असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.  एटीएसने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. 

वाझे यांच्या भावाने, सुधर्म वाझे यांनी ही हेबिअस याचिका केली आहे. सचिन वाझे यांना काही राजकीय वादातून हिरेन यांच्या पत्नीमार्फत आरोप करवून बळीचा बकरा करण्यात येत आहे, असा आरोप यामध्ये केला आहे. एनआयएला अन्य कोणाला तरी लक्ष्य करायचे आहे, असा दावाही यामध्ये केला आहे. एनआयए न्यायालयाने वाझे यांना ता 25 पर्यंत कोठडी सुनावली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईमधील निवासस्थानाबाहेर ता. 25 रोजी स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कौर्पियो कार सापडली होती. ही कार हिरेन यांच्या ताब्यात होती. पण त्याआधी (25) आठवडाभर ती चोरीला गेली होती. विशेष म्हणजे त्यानंतर दिड आठवड्यात यांचा म्रुतदेह ठाणे खाडीमध्ये आढळला होता. 

हिरेन यांनी वाझे यांना कार नोव्हेंबरमध्ये वापरण्यासाठी  दिली होती जी त्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परत केली होती, असे हिरेन यांच्या पत्नीने सांगितले आहे. मात्र या दाव्याचे खंडन वाझे यांनी एटीएसला केले आहे. तसेच कथित घटनेच्या दिवशी दक्षिण मुंबईमध्ये असल्याचा दावा केला आहे.  सध्या या प्रकरणात राजकीय वातावरण तापले असून विविध तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.

mumbai news habeas corpus petition filed by police officer sachin vaze after arrest by NIA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT