मुंबई

24 पर्यंत अटक न करण्याचे निर्देश; बिल्डर अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा

- सुनीता महामुणकर

मुंबई: ईडीच्या रडारवर आलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. येत्या ता 24 पर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडिला आज दिले.

बांधकाम व्यावसायिक भोसले आणि त्यांचा मुलगा अमीत यांच्याविरोधात अमंलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) अंतर्गत आणि मनी लॉन्डरिंगच्या आरोपात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आला आहे.

गुन्हा रद्द करण्यासाठी आणि समन्सच्या विरोधात भोसले यांनी शुक्रवारी याचिका दाखल केली होती.   याचिकेवर न्यायालयाने अंतरिम निर्देश दिले असून दोघांना दिलासा दिला आहे. मात्र 17 तारखेला ED चौकशीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर न्या. एस एस शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे  सुनावणी झाली. ईडीला याचिकेवर लेखी बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. 

पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवर्तक एबीआयएल समूह लोकप्रिय आहे. बांधकाम क्षेत्रात विविध प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. ईडीने मागील काही दिवसांत त्यांच्या कार्यालयांमध्ये छापे टाकले होते.
ईडीने आमच्यावरील आरोपांची माहिती आणि पूर्वसूचना न देता कार्यालयांवर छापे टाकले आहेत. आम्ही सर्व प्रकारे चौकशीला सहकार्य करायला तयार आहोत, त्यामुळे कठोर कारवाई करण्यास ईडीला मनाई करावी, अशी मागणी भोसले यांनी याचिकेत केली आहे. तसेच चौकशीला स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली. 

mumbai high court gives relief to builder bhosale no immediate arrest will be done by ED

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Samsung Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज अब्जावधी डॉलरचं टेक साम्राज्य; Samsung च्या यशाचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT