मुंबई

भयंकर व्हायरसेस आणि किटाणूंपासून अधिकारी कर्मचाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी मंत्रालयात आली ऍडव्हान्स मशीन

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 11 : कोरोना विषाणूसह अन्य किटाणूंवर प्रभावी ठरणाऱ्या मोबाईल यूव्ही स्वयंचलीत मशीनचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते मंत्रालय येथे झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह एसबीआय फाउंडेशनचे मुख्य वित्तीय अधिकारी परमेश्वर राम, प्रकल्प प्रबंधक धवन नागर आदी मान्यवर उपस्थित होते.

या मोबाईल यूव्ही विविध उपयोगी स्वयंचलीत किऑक्स मशीनच्या माध्यमातून शरीराचे तापमान मापन, शरीरातील (ऑक्सिजन) प्राणवायूची पातळी, मोबाईल निर्जंतुकीकरण, अतिनील (अल्ट्रा व्हायलेट) किरणांच्याद्वारे वस्तू, कागदपत्रांचे निर्जंतुकीकरण आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मशीन एसबीआय फाउंडेशन यांच्या सौजन्याने सी.एस.आर. निधीमधून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर युनिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुज्जम्मील शेख व पुण्यातील ईनामदार ग्रुपचे जावेद ईनामदार यांचे सहकार्य लाभले. 

mumbai news high tech UV machine installed in mantralaya to keep viruses away
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT