मुंबई

रस्त्यावरील रूग्णांना मिळणार हक्काचा निवारा, टाटातील कॅन्सर रूग्णांसाठी म्हाडाच्या शंभर सदनिका

संजय मिस्कीन

मुंबई, ता. 25: कॅन्सरसारखा जीवघेणा आजार असणाऱ्या रुग्णांना मुंबईतील टाटा कॅन्सर रूग्णालयात उपचार घेताना राहण्याची प्रचंड गैरसोय दूर करणारा मानवतावादी निर्णय गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज जाहिर केला. टाटा रूग्णालयापासून अवघ्या पाच मिनीटांच्या अंतरावरील हाजी कासिम चाळीतल्या म्हाडाने उभारलेल्या तब्बल शंभर सदनिका या कॅन्सर रूग्णांना उपचारासाठी देण्याचा महत्वकांक्षी निर्णय झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

महाराष्ट्रासह देशभरातील गोरगरीब कॅन्सर रूग्णांना मुंबईत उपचारासाठी आल्यानंतर त्यांच्या निवासाची गैरसोय होते. उन, वारा, थंडी पावसात हजारो रूग्ण फुटपाथावरच राहून उपचार घेत असतात. कॅन्सरच्या उपचारासाठी अनेक रूग्णांना तीन ते सहा महिने मुंबईत थांबावे लागते. दरवर्षी सुमारे 80,000 रूग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र या सर्व रूग्णांना रूग्णालयातील खोल्या अपुर्या पडतात. दररोज किमान 300 रूग्णांना ईच्छा असतानाही राहण्याची सोय करता येत नाही. कॅन्सरच्या उपचरांनी आर्थिक अडचणीत ही कुटूंबे सापडलेली असतात. त्यात मुंबईत खासगी खोल्या भाड्याने घेवून राहणे अत्यंत कठीण असल्याने या रूग्णांचे अतोनात हाल होतात. या अमानवी विदारक स्थितीवर उपाय म्हणून गृहनिर्माण मंत्री यांनी म्हाडा प्रशासनाशी चर्चा केली. त्यातून केवळ सात दिवसांत यावर पर्याय निघाला आणि म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या शंभर सदनिका टाटा रूग्णालयाला देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. 

दरम्यान,  या सदनिकांच्या अंमलबजावणीचे सर्वाधिकार टाटा रूग्णालय प्रशासनाकडेच राहतील. सरकारने हे व्यवस्थापन स्वतःकडे ठेवले तर त्यात राजकारण होण्याची भिती असल्याचे आव्हाड म्हणाले. तुर्तास शंभर सदनिका दिलेल्या असून लवकरच आणखीन शंभर सदनिका देण्यात येतील अशी घोषणाही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारीअधिकारी अनिल डिग्गीकर, मुख्याधिकारी योगेश म्हसे, टाटा रूग्णालयाचे संचालक डाॅ. श्रीखंडे उपस्थित होते. 

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा या काही दिवसापूर्वी टाटा रूग्णालय परिसरातून जात होत्या. त्यांना फुटपाथावर उपचार घेणारे रूग्ण आढळून आले. लहान मुले, महिला, वयोवृद्ध रूग्णांना घेवून झोपलेले त्यांचे नातेवाईक पाहून नताशा प्रचंड अस्वस्थ झाल्या. घरी पोहचताच त्यांनी अत्यंत व्यथित मनाने मंत्री आव्हाड यांना हा प्रकार सांगितला. "बाबा आपण या रूग्णांसाठी काही करू शकाल तर खुप मोठा आधार मिळेल या गोरगरिबांना", अशी विनंती नताशा यांनी केली.

यामुळे स्वतः गिरणी कामगाराचा मुलगा असतानाच्या आर्थिक चणचणीचे दिवस आव्हाड यांना आठवले. त्यातच त्यांच्या आईचा मृत्यु देखील कॅन्सरनेच झालेला होता. त्यामुळे आव्हाड यांनी म्हाडाच्या अधिकार्यांची बैठक बोलावून म्हाडा  काहीतरी मानवतावादी काम उभारू शकते अशी योजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यातून म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या शंभर सदनिका देण्याची योजना केवळ सात दिवसातच पुर्णत्वास नेण्यात आली. या योजनेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तातडीने सहमती दिल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. 

mumbai news hundred MHADA flats will be given to cancer patients of Tata hospital

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT