मुंबई

अतिआत्मविश्‍वास सोमय्यांना भोवणार

सकाळवृत्तसेवा

मुंबई_ भांडूपमधील पोटनिवडणुकीनंतर आणि मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी अति आत्मविश्‍वासाने विधाने करीत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला. मित्र पक्षावर आणि थेट उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या हल्ल्याने युतीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. भाजपमध्येही त्यांच्या विधानांमुळे उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्‍वासाने केलेल्या आरोपांमुळे सोमय्यांची अडचण होण्याची शक्‍यता असल्याची चर्चा भाजपच्या गोटात व्यक्त होत आहे.

मनसेच्या नगरसेवकांना आमच्या मित्र पक्षाने दोन ते चार कोटी रुपयांना विकत घेतल्याचा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला. निवडणूक आयोगाला पत्र देणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र, कोकण विभागिय आयुक्तांकडे तक्रार करणे, तसेच शिवसेनेविरोधात थेट आक्रमक भुमिका घेतल्याने शिवसेनेला खासदार सोमय्या यांनी पुन्हा डिवचले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील तणाव वाढल्याचे दिसत आहे.

एलफिन्स्टन रोड येथील दुर्घटनेनंतर सोमय्या हे नवरात्रीचा दांडिया खेळण्यात गुंग होते असे चित्रिकरण प्रसार माध्यमांनी दाखविले. त्यानंतर त्यांना रेल्वेच्या समितीतून काढण्यात आले. त्यांच्या विधानांमुळे दोन्ही मित्र पक्षांतील तणाव वाढत आहे. यामुळे भाजपच्या पक्ष श्रेष्ठीनी याची दखल घेतल्याचे समजते. त्यामुळे खासदार सोमय्या यांना त्याचा अतिआत्मविश्‍वास भोवणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT