मुंबई

संजय राठोड यांच्याबद्दल निर्णय होतो, मग सचिन वाझेंना एवढं प्रोटेक्शन का? - देवेंद्र फडणवीस

दीनानाथ परब

"मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होऊ शकतो. मग सचिन वाझेंना एवढं प्रोटेक्शन का? सचिन वाझेंकडे असं काय आहे की, सरकार त्यांना एवढं घाबरतं?" असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. सभागृहाबाहेर ते माध्यमांशी बोलत होते. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांना निलंबित करुन त्यांना अटक करावी अशी भाजपाची मागणी आहे. आज सलग दुसऱ्यादिवशी भाजपाने हा मुद्दा सभागृहात लावून धरला. 

"ज्या सचिन वाझेंसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्या वाझेंचा गुन्ह्यामध्ये सहभाग दाखवणारे पुरावे आम्ही दिलेत. सचिन वाझेंना सीआययूच्या महत्त्वाच्या पदावरुन ठेवून तपास होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना पदावरुन दूर केले पाहिजे अशी आमची मागणी होती" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

"२०१ आयपीसी अंतर्गत पुरावे लपवल्याबद्दल त्यांना अटक झाली पाहिजे. काल दिवसभर आम्ही ही  मागणी लावून धरली. पण  सरकारमध्ये वाझेंना आशिर्वाद देणारी काही लोक असल्यामुळे काल त्यांनी त्याबद्दल निर्णय घेतला नाही" असे फडणवीस म्हणाले. 

"जो पर्यंत पुराव्याच्या आधारावर कारवाई होत नाही, मनसुख हिरेन यांना न्याय मिळत नाही, तो पर्यंत  वेगवेगळया माध्यमातून आमचा लढा सुरुच राहिल"  असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

mumbai news leader of opposition fadanavis targets mahavikas aghadi over sachin vaze and mansukh hiren death

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT