Crime News 
मुंबई

Mumbai News: एकाच कुटुंबातील तिघांविरोधात मोक्का! बलात्कार पीडितेचा हत्येचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बलात्कार पीडितेच्या मोठ्या बहिणीची हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन आरोपींविरुद्ध कठोर अशा मकोका कायद्याच्या कलमांतर्गत कारवाई केली आहे. आरोपीमध्ये एका जोडप्याचा आणि त्यांच्या मोठ्या मुलाचा समावेश आहे. आरोपीं जोडप्याने आपल्या लहान मुलाविरुद्धच्या बलात्काराच्या खटल्याचा पाठपुरावा करणाऱ्या 22 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे.

या आरोपींना मकोका न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संघटित टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मकोका अंतर्गत एका कुटुंबावर कारवाई होण्याची पहिलीच वेळ आहे. मकोका कायद्यांतर्गत आरोपीला जामीन मिळणे कठीण असते. तसेच आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना 180 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे.

घटना यावर्षी 29 एप्रिल रोजी घाटकोपर परिसरात घडलेली आहे. घाटकोपर परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय महिलेची तिच्या शेजाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वी मृत महिलेच्या लहान बहिणीवर सामूहिक आरोपी जोडप्याच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबाने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

त्यानंतर संपूर्ण कुटुंब फरार झाले होते. आरोपी कुटुंबीय पीडित कुटुंबाला आरोपी सतत धमकी देत होते. प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती, तर आरोपीचा मुलगा फरार होता. धाकट्या मुलालाही बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली होती. गुरूवारी फरार मुलाला पोलिसांनी अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT