hiren.jpg 
मुंबई

खाडीतून बाहेर काढला त्यावेळी अशा स्थितीमध्ये होता मनसुख हिरेन यांचा मृतदेह

दीनानाथ परब


राज्याचे दहशतवाद विरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात एटीएसला काही महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले आहेत. एटीएस पथकाने काही निष्कर्षही काढले आहेत. प्रथमदर्शनी एटीएसने मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. मनसुख हिरेन आत्महत्या करणार नाहीत, या प्रकरणात सर्वच संशयास्पद आहे. पोलीस यंत्रणेने कसून तपास करावा, अशी मागणी हिरेन कुटुंबाने केली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयए आणि एटीएसने मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या ठाणे खाडीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मनसुख हिरेन ज्या ठिकाणाहून रहस्यमयी पद्धतीने बेपत्ता झाले, ते शेवटचे लोकेशन शोधून काढल्याचे एटीएसने सांगितले आहे. 

"खाडीतून हिरेन यांचा मृतदेह बाहेर काढला, तेव्हा चेहऱ्यावर मास्क आणि काही हातरुमाल होते. त्यांच्या पोटामध्ये पाणी नव्हते, तसेच शरीराला वाळूही लागलेली नव्हती. डावी नाकपुडी आणि खांद्याजवळ जखमा होत्या. त्यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकण्यात आला. भरतीच्यावेळी खोल अरबी समुद्रात मृतदेह वाहून जाईल असा त्यामागे आरोपींचा विचार होता" असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. 

आपण मनसुख हिरेनची कार वापरली नाही असे सचिन वाझे यांनी एटीएसच्या चौकशीत सांगितले. हिरेन बेपत्ता झाले, त्या रात्री सचिन वाझे दक्षिण मुंबईत असल्याचे सीडीआर आणि मोबाइल लोकेशनवरुन स्पष्ट होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिरेन यांचा भाऊ आणि मुलाची ठाणे एटीएसच्या कार्यालयात नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यांची जबानी नोंदवली. एटीएसने दुसऱ्यांदा हिरेन यांच्या नातेवाईकांना बोलावले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT