मुंबई

आता हे काय नवीन ? कोरोनानंतर जाणवतायत औषधांचे साईड इफेक्टस; कोणती आहेत औषधे आणि काय आहेत परिणाम

भाग्यश्री भुवड

मुंबई, 30 : कोविड 19 उपचारांमध्ये यश मिळवण्यासाठी औषधांच्या अनेक नियमावली तयार केल्या गेल्या. शिवाय, काही औषधे एकत्रितपणे वापरण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, एकापेक्षा जास्त औषध एकत्रितपणे वापरल्यास रुग्णांवर गंभीर दुष्परिणाम झालेले आढळून आले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग त्यानंतर, त्याच्यावर केले गेलेले औषधोपचार यांनी रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम झाला आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी विकार जास्त वाढल्याचे डॉक्टरांचे निदर्शनास आले आहे. 

कोरोना उपचारांमध्ये डाॅक्टरांनी ठरवलेल्या औषधांचा वापर रुग्णाच्या गरजेनुसार केला. ज्याचे दुष्परिणाम कोरोनातुन बरे झाल्यानंतरही लोकांमध्ये दिसून आले आहेत. कोरोना विषाणूचा होणारा गुणाकार रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळावे यासाठी आणि त्यातुन रुग्ण पुर्णपणे बरा व्हावा यासाठी औषधांचा वापर केला गेला. 

कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी स्टेरॉयड वापरले गेले. पण, त्यामुळेच रुग्णाची सामान्य रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याचे समोर आले. दुसरे आणि महत्वाचे म्हणजे रेमडेसिव्हिर हे IV तून दिले जाणारे औषध जेव्हा रुग्ण ICU मध्ये दाखल होतो तेव्हा हे दिले जाते. तर, फॅविपिरावीर हे तोंडावाटे दिले जाणारे औषध आहे. जे अँटिव्हायरल आहे. म्हणजेच व्हायरलचा लोड कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यातुनही व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो. कारण, या सर्व औषधांची हेवी डोस दिले जातात. 

रुग्णांना पहिल्या दिवशी फॅविपिरावीरच्या सकाळी आणि संध्याकाळी 9-9 गोळ्या खाव्या लागतात. त्यानंतर 4-4 असे 7 दिवस गोळ्या खाव्या लागतात. याच औषधांचा दुष्परिणाम म्हणजे अशक्तपणा वाटणे, काहीच न करण्याची इच्छा होणे अशी लक्षणे दिसून येतात. म्हणजेच रुग्ण यातून बरा होतो तेवढाच आतुन अशक्त होतो. पण, हा अशक्तपणा जीवासाठी घातक नसतो, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. 

संसर्गाची तीव्रता जास्त तेव्हा स्टेरॉयडचा वापर - 

रुग्णामध्ये संसर्गाची तीव्रता जास्त असते तेव्हा स्टेरॉयडचा वापर केला जातो. स्टेरॉयड हा शरीरातील महत्वपूर्ण घटक असून तो एक हार्मोन सुद्धा आहे. पण, जेव्हा इंन्फेक्शनची तीव्रता वाढते तेव्हा हे स्टेरॉयड कमी पडल्यामुळे बाहेरुन द्यावे लागते. तोंडावाटे किंवा इंजेक्शनमधूनही स्टेरॉयड दिले जाते. पण, कोरोना काळात स्टेरॉयडने खुप चांगली भूमिका बजावली आहे. याचा दुष्परिणाम म्हणजे रुग्णाच्या साखरेची पातळी वाढते. पण, अशाही परिस्थितीत स्टेरॉयड रुग्णांना दिले आहे. कारण, वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करता येते. दरम्यान, स्टेरॉयडचा वापर सरसकट रुग्णांमध्ये केला आहे. गर्भवती मातांना झालेल्या संसर्गाचे निरीक्षण केल्यानंतरच त्यांना स्टेरॉयडचे उपचार दिले आहेत. जर मातेचा जीव धोकादायक परिस्थितीत असेल तर हे उपचार टाळले जातात. लहान मुलांमध्ये कोविडचे प्रमाण फारच कमी आहे. पण, अगदीच कोणी 18 वर्षांवरील रुग्ण कोविडसाठी दाखल झाला तर त्याला ही स्टेरॉयडचे उपचार दिले जातात. 

रेमडेसिव्हिर कोविडसाठी नसलेले औषध- 

रेमडेसिव्हिर हे कोविडसाठी मान्यता असलेले औषध नसल्याचे या आधीच सर्वांसमोर आले होते. पण तरीही उपचारांमध्ये वापरले गेले इतर रुटीन व्हायरल संसर्गात रेमडेसिव्हिर वापरले जात होते. पण, कोरोना ही भयानक महामारी म्हणून घोषित केली गेली. त्यातुन त्याचा वापर केला गेला. ते वापरल्यानंतर व्हायरल लोड कमी झाल्याचे डाॅक्टरांच्या निदर्शनास आले. रेमडेसिव्हिरची आजही क्लिनिकल ट्रायल झालेली नाही. पण, रेमडेसिव्हिरने रुग्ण बरे झाले आणि त्याचा जास्त दुष्परिणाम झालेला नाही हे देखील खरे असल्याचे डॉ. खोब्रागडे यांचे म्हणणे आहे. 

कोणत्याही औषधांच्या जास्तीच्या डोसमुळे किमान 15 ते 20 हा अशक्तपणा लोकांमध्ये राहत आहे. त्यामुळे त्यांना दोन आठवड्यानंतर त्यांच्या दैनंदिन गोष्टीकडे लक्ष द्या असे सांगितले जाते. शिवाय, जर सहव्याधी असतील तर जास्तीत जास्त एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला जातो,असं सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. आकाश खोब्रागडे म्हणालेत. 

mumbai news many people who suffered by covid 19 getting reaction of various other medicines

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT