Fire in Dharavi sakal
मुंबई

Mumbai Dharavi Fire News : धारावीतील गोदामामध्ये भीषण आग, सहा जण जखमी; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

Dharavi Fire News: अग्निशनम दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरु होते

कार्तिक पुजारी

मुंबई- धारावीमध्ये गोदामाला रात्री तीनच्या सुमारास आग लागली. यात सहाजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशनम दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरु होते. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पण, रात्रीच्या सुमाराच आग लागल्याने एकच गोंधळ उडाला होता.

प्राथमिक माहितीनुसार, ६ जण आगीमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आग विझवण्यात आली आहे, सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. आगीमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, काळा किल्लाजवळ अशोल मिल कम्पाऊंट येथे ३ वाजून ४५ मिनिटांनी एका तीन मजली गोदामाला आग लागली. आगीची माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर १० अग्निशन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. काही तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. स्थानिक लोकांनी देखील आग विझवण्यात सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT