Central Railway Mega Block Sakal
मुंबई

Mumbai News : पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक अंतिम टप्पात! प्रवाशांना आणखी दोन दिवस होणार त्रास

-आज फक्त १४८ रेल्वे सेवा रद्द असणार; - रद्द ३१६ लोकल फेऱ्यांपैकी १६८ लोकल पुर्ववत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पश्चिम रेल्वेवर खार- गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सुरु असलेल्या ब्लॉक आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. शेवटचे दोन दिवस प्रवाशांना आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने शनिवारी रद्द केलेल्या नियोजित ३१६ लोकल फेऱ्यांपॆकी १६८ लोकल पुर्ववत करणार आहे. तर दिवसभऱात १४८ लोकल रद्द असणार आहे.

पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांच्या ब्लॉकचे घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू केले आहे. हे काम खार ते गोरेगाव दरम्यान सुरु असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहे. विशेष म्हणजे सर्वधिक महत्वाचे काम ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत केले जात असल्याने पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून ते शुक्रवारपर्यत दिवसाला ३१६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.

त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल सुरु आहे. प्रवाशांची कोंडी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने रद्द केलेल्या ३१६ लोकल पुर्ववत करण्यावर भर दिला आहे.तसेच शनिवारी रद्द केलेल्या नियोजित ३१६ लोकल फेऱ्यांपॆकी १६८ लोकल पुर्ववत करणार आहे. तर दिवसभऱात १४८ लोकल रद्द असणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे, सहाव्या मार्गिकेच्या कामाचा अंतिम टप्पा आले आहे.

४ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबर काम पुर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी करणार आहे. या पाहणीनंतरच सहावी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय होईल अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT