मुंबई

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण : स्कॉर्पियो ताब्यात घेतल्यानंतर 'त्या' इनोव्हाबाबत आली धक्कादायक माहिती समोर

सुरज सावंत

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेली स्कॉर्पिओ कार पोलिसांनी ताब्यात घेतली. मात्र ज्या संशयित इनोव्हा कारचा पोलिस शोध घेत आहेत त्या इनोव्हा कारबाबत महत्वाची माहिती आता समोर आली आहे.संशयित इनोव्हा कारला कालही मुलुंड टोल नाक्याहून ठाण्याच्या दिशेने बाहेर जाताना CCTV मध्ये पाहायला मिळालं होतं. मात्र त्यापुढे नाशिकच्या पडघा टोलनाक्याच्या सीसीटिव्हीत ती कार दिसत नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. पोलिसांकडून या कारचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. मात्र पोलिसांनी पडघा टोलनाक्यावरील CCTV तपासले असता त्यात ही कार दिसून आलेली नाही.

यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या इनोव्हा कारवर जी नंबरप्लेट लावण्यात आली आहे ती खोटी असल्याचं सिद्ध झालं आहे. मात्र त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे गाडीवर जो नंबर पाहायला मिळाला होता ताशा प्रकारचा कुठलाही नंबरच नसल्याची ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे़

संशयित इनोव्हा कारवार जो नंबर पाहायला मिळालेला तो MH 04 AN या सिरिजचा आहे. या सिरिजचा नंबर हा सरकारी गाड्यांना वापरला जातो. मात्र RTO ने 4500 च्या पुढे नंबर देणं बंद केलं आहे. अशात गाडीवर जो नंबर आहे तो आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी जाणून बुजून लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.  या सर्व प्रकरणावरून एक बाब सिद्ध होते की, पोलिसांनी जरी गाडीचा माग काढून आरोपींपर्यंत पोहचायचं ठरवलं, तरीही त्यांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास कठीण जाईल. 

सध्या पोलिस मुलुंड आणि पडघा टोल नाक्याच्यामध्ये गाडीचा शोध घेत आहेत.

mumbai news mukesh ambani security scare horrible information reveled about innvoa

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT