Mumbai News 
मुंबई

Mumbai News : मुंबई आय प्रकल्प वांद्रेबाहेर जाणार ! आशिष शेलार यांच्यासह नागरिकांचा होता विरोध

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईच्या सौदर्यांत भर घालणारा मुंबई आय हा प्रकल्प वांद्रे रेक्लेमेशन येथे साकारला जाणार होता. मात्र त्या जागेसाठी स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्यासह वांद्रेतील नागरिकांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर आता प्रकल्पाची जागा बदलण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. या प्रकल्पाची उभारणी एमएमआरडीए करते आहे.

मुंबईतील लंडन आयच्या धर्तीवर मुंबईत 'मुंबई आय' उभारण्यात येत आहे. वांद्रे रेक्लेमेशन येथे या प्रकल्पाच्या उभारणीपूर्वी वाहतूक प्रभाव आणि पर्यावरणीय पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. तसेच या प्रकल्पाच्या सल्लागार नियुक्तीसाठीही एमएमआरडीएने निविदा काढली होती. मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.

स्थानिक आमदार आशिष शेलार यांनीही वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प वांद्रे रेलक्लेमेशन येथे अडचणीचा ठरत असल्याने या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. मात्र आता हा प्रकल्प वांद्रेतून इतरत्र हलविण्यात येणार असल्याची माहिती आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून दिली आहे. या प्रकल्पामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होईल, येथील शांतता भंग होईल, तसेच पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा प्रकल्प इथे नको,असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

प्रकल्प दृष्टीक्षेपात

मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच पर्यटनवाढीला चालना मिळावी या उद्देशाने ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’या प्रकल्पाची एमएमआरडीएने घोषणा केली होती. वांद्रे रेक्लेमेशन येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. सुमारे १५० व्यासाचे जायंट व्हील ‘मुंबई आय’ प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करेल. मुंबईचे विहंगम दृश्य घडवण्याची ही योजना आहे. याकरिता अंदाजे २००० कोटी खर्च अपेक्षित आहे. मात्र आता नवीन जागेच्या शोधामुळे हा प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मी आणि स्थानिक नागरिक संघटनांच्या सततचा पाठपुरावा आणि विरोधानंतर, एमएमआरडीएने आमच्या मागण्या मान्य केल्या आणि वांद्रे रेक्लेमेशनच्या जागेवरून मुंबई आय हटविले! आशा आहे की, एमएमआरडीए जी पर्यायी जागा शोधेल ती जागा मोठ्या प्रमाणात रहदारी आणि या प्रस्तावित पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या लोकांची गर्दी हाताळू शकेल!

- आमदार आशिष शेलार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

Marathi News Live Updates : जेजुरीजवळ चारचाकी-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

SCROLL FOR NEXT