मुंबई

Mumbai News: जलशुद्धीकरण टॅंक मध्ये पडून मृत्यू झालेल्या मजुराच्या कुटुंबियांना पालिकेची 5 लाखाची मदत

प्रजासत्ताक दिनी आ क्षितिज ठाकूर आणि आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घरी जाऊन दिला धनादेश

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

Mumbai News: वसई विरार महापालिकेच्या फुलपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर कामावर असताना सेटलिंग टॅंक मध्ये पडून 52 वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.मजुराच्या मृत्यू नंतर वसईचे आ.ठाकूर यांनी कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी केली होती.

त्यानंतर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांनी आपले दायित्व समजून, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वतः मजुराच्या घरी जाऊन, आ क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते मयत राऊत यांच्या कुटुंबियांना 5 लाखाच्या मदतीचा धनादेश दिला आहे.

या मदतीमुळे राऊत कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून, पालिका प्रशासन आणि आमदार ठाकूर पिता-पुत्रांचे त्यांनी आभार मानले आहेत.

कैलाश बबन राऊत ( वय 52) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या ठेका मजुराचे नाव असून, हे विरार पश्चिम आगाशी या परिसरात राहत होते. 10 जानेवारी 2024 रोजी वसई विरार महापालिकेच्या विरार पूर्व फुलपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र सेटलींग टॅंक मध्ये पडून मृत्यू झालाय होता.

या अपघाती घटनेनंतर मयताच्या कुटुंबीयांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आ हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली असता, या कुटुंबियांना महापालिकेने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती. या मागणीची आयुक्त तथा प्रशासक यांनी तात्काळ दाखल घेतली होती.

आज शुक्रवार ता 26 रोजी प्रजासत्ताक दिनी पालिकेचा झेंडा वंदन झाल्या नंतर स्वता आयुक्त पवार, आ क्षितिज ठाकूर यांनी मयत राऊत कुटुंबियांच्या घरी जाऊन 5 लाखाचा आर्थिक मदतीचा धनादेश देऊन, त्या कुटुंबियांचे समाधान केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT