मुंबई

मुंबईकरांचा पार्किंगचा प्रश्न मिटला, नो पार्किंगमध्येही पार्क करता येणार वाहनं; BMC राबवणार जबरदस्त योजना

सुमित सावंत

मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि मुंबईतील गजबजाटातील लोकवस्ती. अशात मुंबईतील वाहनसंख्या देखील दिवसागणिक वाढतेय. एकीकडे वाहनसंख्या वाढतेय, मात्र पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना कायम गॅसवर राहावं लागतंय, मोठ्या प्रमाणात पार्किंगच्या समस्येचा सामना करावा लागतो. अधिकृत पार्किंग नसल्याने वाहनधारक आपली वाहनं बऱ्याचदा 'नो पार्किंग' मध्ये आपली पार्क करतात.

नवीन इमारतीत पार्किंगची सुविधा देण्याचा कायदा आहे. मात्र नवीन इमारतींमध्ये किंवा रहिवाशी सोसायट्यांमध्ये पार्किंग उपलब्ध जरी असली तरीही मुंबईत असंख्य जुन्या इमारती आहेत. अशा जुन्या इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे अनेकांना पार्कींच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. 

अशात मुंबई महानगर पालिकेकडून एक अनोखी संकल्पना राबवली जाणार आहे. या संकल्पनेअंतर्गत नागरिकांना नो पार्किंगमध्ये गाडी लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. स्वतःचे वाहनतळ नसलेल्या नागरिकांसाठी ही नवीन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. 

ज्यांच्याकडे पार्किंगची सोटी नाही अशा नागरिकांकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत, प्रस्ताव आल्यास संबंधित रस्त्यावरील वाहनांची रहदारी, रस्त्याकडेला वाहने उभी केल्यास वाहने, पादचाऱ्यांना होणारा संभाव्य अडथळा, संबंधित इमारत, व्यावसायिक आस्थापने याव्यतिरिक्त अन्य वाहने तेथे उभी राहणार नाहीत, याची हमी आणि अन्य निकष पडताळून प्रस्ताव सादर करणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याकडेला वाहनं उभी करण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर महापालिकेशी समन्वय साधून ही व्यवस्था कायमस्वरूपी केली जाणार आहे.

मात्र, सदर योजना मोफत नसणार आहे. कायमस्वरूपी वाहनं उभी करायची झाल्यास महापालिकेला शुल्क भरावं लागणार आहे. तसेच इमारत, रहिवासी संकुल किवा अन्य आस्थापनेने या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात ठेवणे, अन्य वाहने तेथे उभी राहू नयेत याची काळजी घेणे, रस्त्याकडेला शिस्तीत म्हणजेच एकाच रांगेत वाहने उभी राहतील याची खबरदारी घेणे बंधनकारक असणार आहे.

mumbai news park your vehicle in no parking special initiative by BMC to solve parking problem

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT