bhupesh bagal  sakal
मुंबई

Mumbai News : छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा सट्टेबाजीत सहभाग प्रवीण दरेकर यांचा आरोप

विकासाचा दावा करणारे काँग्रेस छत्तीसगडचा विकास करण्याऐवजी सट्टेबाजीत मग्न होते,

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - छत्तीसगडचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा सट्टेबाजीत सहभाग असून महादेव अॅपच्या माध्यमातून त्यांना ५०८ कोटी मिळाले आहेत, हे पैसे निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होते, असा गंभीर आरोप भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. 

विकासाचा दावा करणारे काँग्रेस छत्तीसगडचा विकास करण्याऐवजी सट्टेबाजीत मग्न होते, अशी टीकाही दरेकर यांनी केली. ७ आणि १७ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव अँपच्या प्रवर्तकाच्या माध्यमातून मोठी रक्कम छत्तीसगडमध्ये हलवली जात असल्याची माहिती दोन नोव्हेंबर रोजी ईडीला गुप्तपणे मिळाली. त्याआधारे ईडीने काही ठिकाणी छापे घातले. सत्ताधारी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात रोकड वितरित केल्याचे त्यातून समोर आले.

यासंदर्भात संयुक्त अरब अमिरातीतून पाठविण्यात आलेला खास दूत असीम दास यालाही ईडीने ताब्यात घेतले आहे. असीम दासचे घर व मोटारीतून सुमारे पाच कोटी ३९ लाख रुपये जप्त करण्यात आले असून असीम दास याने त्याची कबुलीही दिली असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

असीम दास हा सोहम सोनीच्या माध्यमातून छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांना पैसे पाठवत होता हे खरे आहे का ? असीम दासला व्हाईस मॅसेजद्वारे रायपूरला जाऊन भूपेश बघेल यांना निवडणूक खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश देण्यात आले होते का ? दोन नोव्हेंबर रोजी हॉटेल टायटनमध्ये असीम दास यांच्याकडून पैसे जप्त करण्यात आले हे खरे आहे का ?

पीएमएलए अंतर्गत वेगवेगळ्या खात्यामध्ये १५ कोटी रुपये गोठवण्यात आलेत हे खरे आहे का ? असीम दास नावाच्या व्यक्तीकडून साडेपाच कोटीच्या आसपास रक्कम जमा करण्यात आली हे खरे आहे का ? असे प्रश्न विचारून या सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेस पक्षाकडून अपेक्षित असल्याचेही दरेकर म्हणाले.

ईडीने महादेव अॅपची अनेक बोगस खाती शोधली आहेत. त्यातील साधारण १५ कोटी ५९ लाख रुपयांची शिल्लक ईडीने गोठवून असीम दासलाही अटक केली आहे. या सट्टेबाजी सिंडिकेटचे प्रवर्तक परदेशात बसून अनेक पॅनल चालवत असल्याचेही पुढे आले आहे.

त्यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असून ईडीने आतापर्यंत ४ आरोपीना अटक केली आहे. ५० कोटींहून अधिकची रक्कम जप्त केली आहे. तर १४ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही दरेकर यांनी दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT