Mumbai News 
मुंबई

Mumbai News : मान्सूनपूर्व कामांना वेग! पावसाळ्यापूर्वी एमएमआरडीएकडून मोठ्या नाल्यांची सफाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पामध्ये मान्सूनपूर्व तयारी प्रगतीपथावर असून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी प्रकल्पातील वाकोला नाल्यासह इ.नाल्यांची साफसफाई तसेच मान्सून दरम्यान आवश्यकतेनुसार यंत्रसामग्री,पंप इ.ची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला सांताक्रूझ-चेंबूर लिंक ‘सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता' प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम वेगात सुरु आहे. या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरु असून आतापर्यंत पहिल्या भागाचे ९० टक्के तर दुसऱ्या भागाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाअंतर्गत बीकेसीच्या सभोवतालचे रस्ते विकसित करण्यात येतआहेत, तसेच ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडले जात आहेत. त्यामुळे मुंबईचे व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी भागात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.

या विस्तारीकरण प्रकल्पांमध्ये मान्सूनकाळात पाण्याचा जलद निचरा व्हावा यासाठी एमएमआरडीएकडून तयारी सुरु असून आवश्यकतेनुसार यंत्रसामग्री, पंप याची व्यवस्था एमएमआरडीएच्या टीमकडून करण्यात येईल अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT