मुंबई

प्रॉपर्टी टॅक्स बाबत मोठी बातमी; नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून महापालिकेचं महत्त्वाचं पाऊल

शरद वागधरे

नवी मुंबई : कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळावा या दृष्टीने 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची मुदत वाढवण्याबाबत विविध माध्यमातून मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर अभय योजनेस 1 मार्च 2021 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

मालमत्ताकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असून 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के सूट देणारी थकबाकीदारांसाठी लाभदायी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. 

अभय योजनेअंतर्गत 15 फेब्रुवारीपर्यंत 97 कोटी 88 लाख इतकी रक्कम प्रत्यक्ष जमा झाली असून अभय योजनेचा लाभ घेताना नागरिकांना 52 कोटी 30 लाख रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेची सूट मिळाली आहे. या दोन महिन्यांच्या अभय योजनेस अजून थोडा कालावधी वाढवून मिळावा, अशा प्रकारची मागणी केली जात होती. ही मुदत 15 दिवस वाढवून देण्यात आली आहे.

आता 1 मार्च 2021 पर्यंत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकीत रक्कम अधिक 25 टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के सूट मिळणार आहे. तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन 1 मार्चपर्यंत न थांबता आजच नवी मुंबई महापालिकेच्या या वेबसाईटला भेट देऊन अभय योजनेचा लाभ घ्यावा व शहर विकासास हातभार लावावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

mumbai news property tax exemption scheme by navi mumbai municipal corporation


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT