मुंबई

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात शिवसेना रस्त्यावर, मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शने

पूजा विचारे

मुंबई: पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात आज शिवसेनेनं मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शने केली. पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणं आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ होत असल्यामुळे नागरिकांना महागाईचा भडका सहन करावा लागत आहे. या दरवाढी विरोधात आज मुंबईतील गिरगावात शिवसेनेनं निदर्शने केली.

तसंच केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी दादर येथील शिवसेना भवनासमोरील पेट्रोल पंपवरही आंदोलन केलं. तर दक्षिण मुंबईत शिवसेनेनं केंद्र सरकारविरोधी बैलगाडी आंदोलन करत निषेध नोंदवला. 

कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती ९३ रुपयांवर तर डिझेल दरवाढ ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटीविरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. 

शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून, शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गर्शनाखाली विभाग प्रमुख, मुख्य प्रतोद, आमदार सुनिल प्रभु, आमदार रवींद्र वायकर आणि विधानसभा संघटक नगरसेविका साधना माने यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारचा गैरकारभार, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा जनतेवर भार!, रद्द करा, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा....,सारी जनता एक हो, एक होके केंद्र सरकार को फेक दो... मोदी सरकार मुर्दा बाद.... केंद्र सरकार हाय हाय... अशा जोरदार घोषणांनी गोरेगाव रेल्वे स्थानक परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळतं आहे. सध्या देशभरात पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र पेट्रोल डिझेलचे भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेना आज राज्यभर मोर्चे काढत आहे. पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेनं केंद्र सरकारविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करताना दिसत आहे.

भायखळ्यातही शिवसेनेचा एल्गार 

भायखळा पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेरील मुख्य रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी हातात फलक घेऊन केंद्रातील भाजप सरकारचा विरोधात आंदोलन करण्यात आलं. 

'रद्द करा  रद्द करा पेट्रोल डिझेल वाढ रद्द करा, मोदी सरकार हाय हाय च्या घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, नगर सेविका सिंधू मसुरकर, माजी नगरसेविका स्नेहल आंबेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्यने शिवसैनिक सहभागी झाले होते. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सीएसएमटी लोहमार्ग पोलिस आणि भायखळा पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Mumbai news Shiv Sena protest against central government fuel price hike

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT