मुंबई

मुंबईकरांनो काळजी घ्या ! मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर वाढतोय

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 26 : मुंबईत नव्या रुग्णांचा भडका उडाला असून आज 1,034 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,23,877 झाली आहे. आज 712 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,02,232 रूग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ सुरूच असून कोविड रुग्णवाढीचा दर वाढून  0.27 इतका झाला आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 32,30,798 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत आज केवळ 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11,461 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 256 दिवसांवर आला आहे.

मुंबईत आज मृत झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांपैकी 2  पुरुष तर 1 महिला होती. तर तीनही मृतकांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबईत 13 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 120 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 7,446 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केअर सेंटरमध्ये 1 मध्ये 431 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

mumbai news take care mumbaikar covid patients count is increasing day by day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT