मुंबई

लोकलपेक्षाही जलदगतीने 'या' ठिकाणांहून पसरतोय कोरोना; मुंबईकरांनो काळजी घ्या

समीर सुर्वे

मुंबई : गेल्या काही दिवसात उच्चभ्रु वस्त्या, उंच इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण वाढताना पाहायला मिळतायत. त्यामुळे लोकलपेक्षाही बाजार, लग्नसोहळे, पब यांसह इतर गर्दीच्या ठिकाणांमुळे कोविड पसरत असल्याचा अंदाज महानगर पालिकेचा आहे. ‘ज्या परीसरातून कोविडचा विषाणू पसरत आहे अशा ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने विशेष पथकं तयार केली आहेत अशी माहिती अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत गेल्या नऊ दिवसात सिल मजल्याची संख्या 800 ने वाढली आहे. तर, सिल इमारतींची संख्या 83 ने वाढली आहे. 3 मार्च रोजी सिल इमारतींची संख्या 145 होती, ती आज 228 पर्यंत पोहचली आहे. तर, सिल मजल्यांची संख्या 2 हजार 016 वरुन 2 हजार 815 वर पोहचली आहे. "लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपेक्षा इतर ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना अधिक संक्रमण झाले आहे", असेही काकाणी यांनी सांगितले.

महानगर पालिकेने आतापर्यंत केलेल्या अभ्यास बाजार, लग्नसोहळे, पबही कोविड पसरविण्यास जास्त जबाबदार असल्याचे आढळले आहे. मुंबईतील साडे सात लाखाच्या आसपास नागरीक प्रतिबंधात आहेत.वस्त्या चाळींमधील 27 प्रतिबंधीत क्षेत्रात 1 लाख 79 हजार नागरीक राहात आहेत. तर, सिल मजल्यांवर 4 लाख 35 हजार नागरीक राहात आहेत असून सिल इमारतींमध्ये 1 लाख 36 हजार नागरीक राहात आहेत.

रविवारी 22 हजार जणांवर कारवाई

मास्क न वापरणाऱ्या 22 हजार 980 जणांवर रविवारी कारवाई करण्यात आली आहे. यात मुंबई पोलिसांनी 8 हजार 352 जणांवर कारवाई केली आहे.संपुर्ण दिवसात 45 लाख 96 हजार रुपयांचा दंड जमा झाला आहे.

मंगळवारपर्यंत प्रतिक्षा
इमारतींमध्ये तेही बहुमजली इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, तत्काळ लॉकडाऊन लावण्याबाबत कोणताही निर्णय नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तीन चार दिवस कोविड रुग्णांची संख्या पाहून याबाबत राज्य सरकारशी चर्चा करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

mumbai news weddings local markets and pubs increasing corona count in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT