Mumbai News 
मुंबई

Mumbai News : मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे विलंबाने; प्रवाशांना लोकल गर्दीचा त्रास

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम रेल्वेने सफाळे स्थानकादरम्यान पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी बुधवारी (ता.२१) दोन तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात आलेला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. अनेक लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना लोकल गर्दीचा सामना करवा लागला आहे.

पश्चिम रेल्वेने बुधवारी सफाळे स्थानकावर पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी सकाळी ८.५५ ते १०. ४० वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आलेला होता. त्यामुळे काही लोकल गाड्या रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट केल्या गेल्या होता.

ज्यामध्ये ट्रेन क्रमांक ०१३३७ बोईसर-वसई रोड मेमू, दुपारी १२ वाजेची विरार-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्यात आली होती. तर, सकाळी ५.४९ वाजेची डोंबिवली - बोईसर मेमूला वसई रोड पर्यंत चालवण्यात आली. सकाळी ८.३५ वाजेची डहाणू रोड ते बोरिवली लोकल केळवे रोडपर्यंत चालविण्यात आली. विशेष म्हणजे ब्लॉककालावधीत केळवे रोड ते बोरिवलीदरम्यान लोकल सेवा नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

विशेष म्हणजे हा ब्लॉक पश्चिम रेल्वेने सकाळी घेतल्याने पश्चिम रेल्वेचा अप- डाऊन मार्गावरील लोकल सेवांचा वेळापत्रकांवर मोठा परिणाम झाला होता.अनेक लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना लोकल गर्दीचा सामना करवा लागला आहे. ब्लॉकचा परिणाम दिवसभर पश्चिम रेल्वेवर दिसून आलेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT