मुंबई : गेल्या दोन वर्षांत मुंबईत नसबंदी शस्त्रक्रिया घटल्या आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षात नसबंदी करून घेण्याचे प्रमाण 2015 ते 2018 या कालावधीपेक्षा कमी झाले आहे. दरम्यान, 2020 मध्ये 2019 च्या तुलनेत नोव्हेंबरपर्यंत फक्त 11 टक्के महिला आणि 9 टक्के पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे.
2019-20 मध्ये 17, 659 महिला आणि 116 पुरुषांची नसबंदी झाली. त्याचवेळी मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत 2007 महिला आणि केवळ 12 पुरुषांनी नसबंदी केली. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते या वेळी नसबंदीची संख्या गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत निम्मी ही झालेली नाही.
नसबंदीत महिलांचा जास्त पुढाकार -
2015 ते 2020 या पाच वर्षाच्या कालावधीत 97 हजार 668 महिलांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करुन घेतल्या असून आतापर्यंत त्यातील फक्त 45 स्त्रियांची नसबंदीची शस्त्रक्रिया फेल झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर, नसबंदीच्या या उपक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त पुढाकार घेतला असून फक्त 2,740 पुरुषांनी नसबंदी करुन घेतली आहे. तर, यापैकी एकाही पुरुषाच्या नसबंदीची शस्त्रक्रिया फेल झालेली नाही.
डॉ. मंगला गोमारे (मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी, BMC ) म्हणाल्यात, लोकांमध्ये आता हळूहळू नसबंदीबाबतची जनजागृती वाढत आहे. पण, गेल्या दोन वर्षात ही संख्या कमी झालेली दिसते. दरम्यान, कोरोनाकाळात लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे नसबंदीचे आकडे कमी झाले. मात्र, आता हे प्रमाण वाढेल कारण, सर्व रुटीन पुन्हा सुरू झाले आहे. रूग्णांना संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. नसबंदीची इच्छा असणार्यांनी पालिकेच्या रुग्णालयात जाऊन करुन घ्यावी. तिथे त्यांना मार्गदर्शन केले जाईल.
महत्त्वाची बातमी - हापूस आंब्यासाठी थेट निर्णयात बदल, APMC मधील बदललेल्या महत्त्वाच्या निर्णयाची रविवारपासून अंमलबजावणी
नसबंदीचा अहवाल -
महिलांच्या फेल झालेल्या शस्त्रक्रिया -
mumbai news who leads in family planning surgery male or female read full report
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.