Mumbai North-East Lok Sabha 2024 esakal
मुंबई

Mumbai North-East Lok Sabha 2024: ईशान्य मुंबईत महायुती, आघाडी थेट लढत; मनोज कोटक यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता

Mumbai North-East Lok Sabha 2024: मराठी आणि गुजराती भाषकांची मते येथे निर्णायक आहेत. ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना तर महायुतीमधून भाजपने मिहीर कोटेचा यांना रिंगणात उतरवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai North-East Lok Sabha 2024: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ बहुतांश झोपडपट्ट्यांनी व्यापलेला आहे. कुर्ला येथून सुरू होणारा डोंगर मुलुंडपर्यंत विस्तारला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या वसाहती आहेत. त्यामुळे झोपडपट्ट्या आणि मध्यमवर्गीयांच्या वसाहती अशी इथे विभागणी झाली आहे. मुलुंडमध्ये विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम तसेच मानखुर्द शिवाजीनगर अशी या मतदारसंघाची रचना आहे. मराठी आणि गुजराती भाषकांची मते येथे निर्णायक आहेत. ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना तर महायुतीमधून भाजपने मिहीर कोटेचा यांना रिंगणात उतरवले आहे.

२०१९ चे चित्र

मनोज कोटक भाजप (विजयी) मते : ५,१४,५९९

संजय दिना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : २,८८,११३

निहारिया खोडाले (वंचित बहुजन आघाडी) मते : ६८,२३९

संजय सिंग (बसप) मते : ७,७७७

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : २,२६,४८६

वर्चस्व

२००४ -काँग्रेस

२००९ -राष्ट्रवादी काँग्रेस

२०१४ - भाजप

२०१९ - भाजप

सद्य:स्थिती

शिवसेनेचे दोन गट झाले आहेत; मात्र शिंदे गटाचा येथे फारसा प्रभाव नाही.

मनोज कोटक यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात मराठी भाषक मतदारांची संख्या मोठी आणि निर्णायक आहे.

मराठी फॅक्टर या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो.

त्याखालोखाल गुजराती आणि मुस्लिम मतदारांची संख्या आहे. त्यांचाही कौल महत्त्वाचा आहे.

हे मुद्दे प्रभावी ठरणार

म्हाडा वसाहतींच्या इमारतींचा पुनर्विकास

झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास

उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या

कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंड

मेट्रोने जोडल्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात वाढती गर्दी

वनजमिनीवरील अतिक्रमणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT