Mumbai North West Loksabha Result sakal
मुंबई

Mumbai North West Loksabha Result: ईशान्य मुंबईत कीर्तिकरांना धक्का, मतमोजणीत ट्विस्ट वायकर ४८ मतांनी जिंकले

North west Mumbai Lok Sabha 2024 Election Result Ravindra Waikar won amol kirtikar| रवींद्र वायकर हे ठाकरे गटातून शिंदे गटात आले आणि लगेचच त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली.

Chinmay Jagtap

Mumbai North West: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांनी रवींद्र वायकर यांना २००० मतांनी पराभूत केले होते. मात्र रवींद्र वायकर फेर मतमोजणीची मागणी केली. आता रवींद्र वायकर ४८ मतांनी जिंकले आहेत.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांत सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस तर त्यानंतर शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. गेल्या दोनवेळा गजानन कीर्तिकर हे या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले आहेत.

यंदाच्या निवडणुकीमध्ये येथे शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली. रवींद्र वायकर हे ठाकरे गटातून शिंदे गटात आले आणि लगेचच त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली.(ekanth shinde vs Uddhav thackeray)

Mumbai North West Loksabha Result

Mumbai North West Loksabha Resultयामुळे मतदारांमध्ये जरा संभ्रमाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्याचा फायदा अमोल कीर्तिकर यांना होऊ शकतो असे म्हटले जात आहे. मात्र दुसरीकडे या ठिकाणी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर काम केले असल्यामुळे मोदी लाटेचा फायदा हा रवींद्र वायकर यांना मिळू शकतो अशा प्रकारची चर्चा आहे.(gajanan kirtikar vs sanjay nirupam)

2004 ते 2014 अशी दहा वर्ष या ठिकाणी काँग्रेसचा खासदार होता. तर 2014 ते 2024 अशी 10 वर्ष या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे. गेले दोन टर्म या ठिकाणी गजानन कीर्तिकर निवडून आले आहेत.

2019 साली गजानन कीर्तिकर यांनी संजय निरुपम यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव केला होता. त्यावेळी गजानन कीर्तिकर यांना ५ लाख ६९ हजार मतं मिळाली होती तर संजय निरुपम यांना ३ लाख ९ हजार मतं मिळाली होती.(2019 mumbai loksabha result)

Mumbai North West Loksabha Result

सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी शिंदे सरकारने केलेली कामं आणि मोदी सरकारने केलेली कामं हा प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा ठरला. या ठिकाणी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मोठा आहे. याचबरोबर चाळींचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे.(marathi political news)

Mumbai North West Loksabha Result

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT