Mumbai धुळीचे वादळ sakal
मुंबई

Mumbai : मार्च महिन्यानंतर पुन्हा एकदा रविवारी दुपारी ठाणे जिल्ह्यातील काही भागात आले धुळीचे वादळ

राज्यात विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत.

शर्मिला वाळुंज

Mumbai - गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दोन दिवसंपासून काहीसा दिलासा मिळत आहे. वातावरण काहीसे ढगाळ असतानाच रविवारी दुपारी कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर परिसरात धुळीचे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवेमध्ये प्रचंड धुळीचे कण असून रस्त्यावर चालताना नागरिकांना, वाहन चालकांना याचा त्रास होत आहे. मकरच महिन्यात असेच धुळीचे वादळ आले होते.

राज्यात विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत. त्यातच दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा काहीसा कमी झाला असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र घामाच्या धारांनी नागरिक न्हाऊन निघत असतानाच रविवारी सुटलेल्या वाऱ्याने सारेच काहीसे सुखावले आहे.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण परिसरात रविवारी सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ठाणे जिल्हातील शहर आणि ग्रामीण परिसरात काही काळ धुळीच्या चादरी आड झाकोळली गेली होती. दरम्यान असेच धुळीचे वादळ मार्च महिन्यात सुद्धा आले होते.

जोरदार वाऱ्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील शहरामध्ये रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने काही काळ दृश्य मानता कमी झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे धुळीचे लोट उठले होते. दरम्यान, शहरावर पसरलेल्या या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावल्याचे बोलले जात आहे. परिणामी श्वसन आजार असणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT