corona sakal
मुंबई

मुंबई : कोरोनाचे फक्त 395 गंभीर रुग्ण

रुग्णालयात 2975 रुग्णांवर उपचार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर्वाधिक कोरोना (Corona) बाधित रुग्ण सापडणाऱ्या मुंबईत (Mumbai) कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे दिसते. विविध रुग्णालयांत केवळ 2975 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 395 रुग्ण गंभीर असल्याची माहिती पालिकेने आपल्या अहवालात दिली आहे..

रविवारी 44,124 कोरोना चाचण्या केल्या असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आता पर्यंत 91,77,752 एवढया चाचण्या झाल्या आहेत.मुंबईतील बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1,611 दिवस इतका आहे.

मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाल्याचे दिसते. कोविड रुग्णांसाठीच्या एकूण रुग्णशय्यापैकी 87 टक्के रुग्णाशय्या रिक्त आहेत. सध्या रुग्णालयांतील केवळ 5 टक्के रुग्णशय्या कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या असून नव्याने येणाऱ्या रुग्णांना कोविड काळजी केंद्रामध्ये दाखल केले जात आहे.

  • रुग्णालयांत दाखल रुग्ण - 2,974

  • गंभीर रुग्ण - 390

  • लक्षणे असणारे रुग्ण - 1305

  • लक्षणे विरहित रुग्ण - 1,279

रुग्णशय्या प्रकार एकूण भरलेले रिक्त

  • ऑक्सिजन - 7606 754 6852

  • आयसीयू - 2249 615 1634

  • व्हेंटिलेटर - 1290 405 885

कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने मुख्य रुग्णालयांमध्ये इतर उपचार व शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. मुख्य रुग्णालयांत केवळ 5 टक्के रुग्णशय्या कोविड रुग्णांसाठी असून आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येईल. उपचारासाठी कोविड केंद्रांचा वापर अधिक करण्यात येत आहे.

-डॉ. रमेश भारमल, संचालक, पालिका वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईतील मतदारांसाठी अलर्ट! मतदानाचे तास कमी केले; नेमकी वेळ काय? वाचा सविस्तर...

Election Security : मतदानाचा फोटो व्हायरल केला तर थेट गुन्हा! कोल्हापूर पोलिसांचा कडक इशारा

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला तिळ-गूळ आणि खिचडी का खाल्ली जाते? जाणून घ्या धार्मिक कथा

Nashik Municipal Election : नाशिकचा महासंग्राम! राजकीय चिखलफेक थांबली, आता फैसला मतदारांच्या हाती; १५ जानेवारीला मतदान

Vote Counting Plan : तासात एका प्रभागाची मतमोजणी, दुपारी एकपर्यंत निकाल; कोल्हापुरात महापालिका प्रशासनाची जय्यत तयारी

SCROLL FOR NEXT