organ donation
organ donation sakal media
मुंबई

मुंबईत 28 वे अवयवदान; फोर्टीस ते ग्लोबल रुग्णालय ट्रेनमधून आणले अवयव

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत (Mumbai) या वर्षातील 28 वे अवयवदान (organ donations) यशस्वीरित्या झाले आहे. कल्याण (kalyan) फोर्टीस रुग्णालयात (Fortis hospital) हे अवयवदान झाले असून मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात (global hospital) हे अवयव आणले गेले. हे अवयव मुंबईच्या लोकल ट्रेन (Mumbai train) मधून आणले गेले. कल्याण स्टेशन ते दादर स्थानकापर्यंत 58 मिनिटांचा प्रवास करत  ग्लोबल रुग्णालयात अवयव आणले गेले.

महिलेल्या मृत्यू पश्चात नातेवाईकांनी तिचे काही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. हृदय, यकृत आणि किडनी साठी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांची यादी वाढत असून बरेचसे लोक अजूनही प्रतिक्षा यादीत आहेत. त्यामुळे, अवयदानाची जागृती आणखी मोठ्या पद्धतीने वाढवली पाहिजे असे मत तज्ज्ञ मंडळीकडून व्यक्त केले जात आहे.

34 वर्षीय महिलेने 15 सप्टेंबर या दिवशी केलेल्या अवयव दानातून चार जणांना जीवदान मिळाले आहे.फोर्टिस रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचे ह्रदय, यकृत,  दोन्ही मूत्रपिंड हे अवयव दान केले. झेडटिसीसी समितीने मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषांनुसार दान आणि प्रत्यारोपण प्रक्रिया पार पाडली अशी माहिती झेडटीसीसीकडून देण्यात आली.

मात्र अवयव दात्याच्या कुटुंबीयांनी माहिती झेडटीसीसीने गुप्त ठेवली आहे. यावर्षीच्या हे 28 वे अवयवदान झाले आहे.दान केलेले अवयव जास्तीत जास्त वेगाने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ट्रेनचा वापर करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 16 फेब्रुवारी 2019 या दिवशी ठाणे ते दादर असा प्रवास करत अवयव रुग्णालयात पोहोचवण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एकाला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी!

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आणखी दोन जणांचा मृत्यू! 14 वरून आकडा पोहचला 16 वर...काही जण अडकल्याची भिती

हैदराबादला जाणाऱ्या बसला आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू, बस जळून खाक

Share Market Today: शेअर बाजाराच्या रिकव्हरीत कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

दिल्लीच्या विजयामुळे बदललं CSK, RCB अन् SRHचं नशीब! कोणाला झाला फायदा अन् कोणाचं नुकसान? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT