mumbai police action Crypto currency fraud accused arrested from West Bengal sakal
मुंबई

Mumbai Crime News : अनेकांची क्रिप्टो करंसीद्वारे फसवणूक करणारा पश्चिम बंगालमधून जेरबंद

मुंबई पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत आरोपीला थेट पश्चिम बंगाल मधून अटक करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत आरोपीला थेट पश्चिम बंगाल मधून अटक करण्यात आली आहे. 24 वर्षीय सैदुलअली मकबुलअली मौला या आरोपीला पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील दर्गा पारा गावातून अटक केली आहे.

क्रिप्टो करंसीच्या नावाने दोन तासात दुप्पट रक्कम कमवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने अनेकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात अशाच प्रकारे एका विद्यार्थीनीची ऑनलाईन फसवणुक आरोपीने केली होती. या प्रकरणात माटुंगा पोलीस तपास करत करत आरोपी पर्यंत पोहचली.

क्रिप्टो करंसीत नफ्याचे अमिष

या प्रकरणातील पिडीत विद्यार्थिनी समीक्षा ढुमणे यांच्या मोबाईल फोनवर क्रिप्टो करंसीबाबत "बिनोमो बीटकॉइन"या कंपनीच्या नावाने जाहीरातीचा मॅसेज आला. याद्वारे आरोपीने विद्यार्थिनीला क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना दुप्पट रक्कम परत करण्याचे अमिष दाखवले.

तिचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने आपला मोबाईल क्रमांक शेअर केला. पिडीत समिक्षाने आमिषाला बळी पडत आरोपीने दिलेल्या मोबाईलवर संपर्क केला. तसेच क्यु.आर. कोडच्या माध्यमातुन एकुण 23 हजर रुपयाचा व्यवहार केला. कालांतराने रक्कम दुप्पट झाली नाही. तसेच आरोपीने मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता तो क्रमांक सेवेत नसल्याचे कळले. अखेर पिडीतेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

पोलीस तपास

पिडीत तरुणीने नोंदवल्या गुन्ह्याचा माटुंगा पोलिसांनी तपास सुरू केला .आरोपीच्या सोशल मीडिया खात्याची व आर्थिक व्यवहाराची तांत्रिक माहिती घेण्यात आली. यातील आरोपीचा साऊथ 24 परगनाज, पश्चिम बंगाल येथे आरोपीचे लोकेशन पोलिसाना सापडले . माटुंगा पोलीसांचे तपास पथक तयार करुन तातडीने पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात आली.

दक्षिण 24 परगना जिल्ह्याच्या, परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने आरोपीची खात्रीशीर माहिती काढून, पाळत ठेवून, स्थानिक पोलिसांची मदत घेवून मोठ्या शिताफीने कार्यवाही करुन आरोपीतांना अटक केली. या प्रकरणी अजून कोणकोणाची आरोपींनी अशीच फसवणूक केली आहे याचा पुढील तपास माटुंगा पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar Building Collapse: विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; ३२ तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरुच

Latest Marathi News Updates : अभिनेता शाहरूख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याविरोधात गुन्हा दाखल, काय आहे कारण?

Rain Update: 'सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचे दिवस वाढणार'; शनिवारपासून पूर्वा नक्षत्र, गणरायाचे पावसात स्वागत

Ganesh festival २०२५: 'गणरायांच्‍या आगमनाने आनंदवर्षा'; सातारा जिल्ह्यात वरुणराजाच्‍या विश्रांतीने उत्‍साहाला उधाण

Karad Accident: 'राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार'; भीषण धडकेने हेल्मेट तुटलं अन्..

SCROLL FOR NEXT