मुंबई

9 कोटींच्या फसवणूकी प्रकरणी शकीलच्या हस्तकाला मुंबईतून अटक

अनिश पाटील

मुंबई:  कुख्यात गँगस्टर छोटा शकीलचा खास हस्तकाला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरी लोखंडवाला परिसरातून अटक केली आहे. कुलविंदरसिंग बैन्स उर्फ जिम्मी बेंस उर्फ अजय (29) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर हत्या, खंडणी, जिवे मारण्याची धमकी, फसवणूक या सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

90 च्या दशकात छोटा राजन टोळीत शार्प शूटर म्हणून कुलविंदरसिंग बैन्स उर्फ जिम्मी बेंस उर्फ अजय हा कार्यरत होता. राजनसोबत पैशांवरून वाद झाल्यानंतर त्याने छोटा शकिलसोबत काम करण्यास सुरूवात केली शकिलच्या सांगण्यावरून कुलविंदरसिंग बैन्स उर्फ जिम्मी बेंस उर्फ अजयने अनेकांवर जीवघेणे हल्ले केले, तर खंडणीसाठी अनेकांना धमकावले. त्याच्यावर मुंबईतच 24 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या दरम्यान शकिलच्या सांगण्यावरून तो केनियाला गेला असताना,  त्याच्यावर टोळी युद्धातून हल्ला झाला होता. यानंतर शकिलपासून तो हातभर अंतर ठेवून होता. पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी तो वारंवार आपली नाव बदलून वावरायचा.

या दरम्यान ऑस्ट्रेलिया, दुबईच्या वारंवार फेऱ्या करत होता. तर नेपाळ मार्गे भारतात येऊन पंजाबमध्ये लपून बसायचा. मुंबईत एका व्यावसायिकाला त्याने नुकताच 9 कोटींना चुना लावला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने प्रथम गुन्हा दाखल केला होता. पण त्याप्रकरणू लुक आउट नोटीसवरून एका आरोपीला सोडण्यात आल्याच्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आल्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. कुलविंदरसिंग बैन्स उर्फ जिम्मी बेंस उर्फ अजय हा अंधेरीत असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता,  न्यायालयाने त्याला 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Police anti ransom squad arrested chota Shakeel underling Andheri Lokhandwala

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT