मुंबई

रमझान दरम्यान गर्दी टाळण्यासाठी पोलिस वापरतायत 'हा' उपाय

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 25 - रमझानचा महिना सुरु झाल्यानंतरही मुंबईतील लॉकडाऊनमघ्ये कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर गर्दी होऊ नये यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे. आम्ही कोणत्याही भागात विशेष सुविधा दिलेली नाही असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. रमझानच्या महिन्यात इफ्तार तसेच सेहरीसाठी खास सुविधा दिली असल्याचे संदेश समाजमाध्यमांवरुन प्रसारीत होत आहेत, पण त्यात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले.

सर्व ठिकाणी एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या संकेताचे पालन केले जाणार आहे. कोणत्याही मशिदीच्याच नव्हे तर इमारतीच्या परिसरात तसेच गच्चींवर गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. याचे पालन न केल्यास योग्य ती कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुस्लीम बहुसंख्य असलेल्या परिसरात लॉकडाऊन कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा प्रश्न होऊ नये यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच सामाजीक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. कटेनमेंट विभागातून बाहेर पडण्यास कोणालाही परवानगी नसते, त्यामुळे सेहरी आणि इफ्तारसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. 

रमझानच्या कालावधीत अनेक मशीदींवर आकर्षक रोषणाई करण्यात येते, पण यावेळी कोणताही उत्साह या परिसरात जाणवत नाही. एवढेच नव्हे तर रमझानची मुंबईतील ओळख असलेला महम्मद अली रोडवरही गर्दी नाही. येथील फूड बाजारास अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक बिगर मुस्लीमही गर्दी करतात. मात्र सध्या हा फूड बाजार पूर्णपणे बंद आहे.

mumbai police are using drones to keep tab to avoid public gathering during ramazan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT