मुंबई

मुंबईत १५ मिनिटात दोघांची हत्या करणाऱ्या सायको किलरला अटक

आरोपीने दोन्ही ठिकाणी फुटपाथवर झोपलेल्या दोन व्यक्तीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून हत्या केली होती.

सुरज सावंत

मुंबई: रमण राघव (Raman raghav), बियर मॅन नंतर मुंबईत आणखी एका सायको किलरने (psycho killer) दहशत निर्माण केली होती. सुरेश शंकर गौडा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने 2015 सालीही अशाच प्रकारे कुर्ल्यात (kurla) एकाची हत्या (Murder) केली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी नराधम आरोपीला शोधून काढलं. मुंबईच्या रस्त्यांवर हा सायको किलर मोकाट फिरत होता.

अवघ्या 15 मिनिटात त्याने दगडाने ठेचून दोन जणांची हत्या केली. सायको किलरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात अवघ्या 15 मिनिटात दोघांची हत्या झाली होती. आरोपीने दोन्ही ठिकाणी फुटपाथवर झोपलेल्या दोन व्यक्तीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून हत्या केली होती. धक्कादायक म्हणजे आरोपीने चौकशी दरम्यान या हत्या सहज म्हणून केल्याचे सांगितलं.

मुंबई पोलीस आता फुटपाथवर झालेल्या सर्व हत्यांच्या केसेसची पडताळणी करणार आहेत. आरोपी गौडाने अशा अनेक हत्या केल्याचा संशय आहे. 2015 सालच्या हत्येच्या गुन्हयात त्याला अटक झाली होती मात्र पुराव्याअभावी त्याची 2016 साली सुटका झाली होती. सध्या आरोपी तुरुंगात असून भायखळा पोलीस दुसऱ्या हत्येच्या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT