Mumbai CP Sanjay Pandey Sakal
मुंबई

पोलीस आयुक्तांचं मुंबईकरांसाठी प्रेमळ ट्वीट! वाहने उचलून नेणार नाही पण...

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांसाठी एक खास ट्वीट लिहीलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईमध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. वाहनधारक कळत नकळत वाहने नो पार्किंगमध्ये लावतात मग पोलीस ते टो करून घेऊन जातात. अशा प्रकारच्या कारवाईमुळे अनेकदा पोलीसांवर टीका केली जाते. म्हणूनच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुंबईकरांना उद्देशून एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून (Tweet) त्यांनी वाहने उचलून नेणे थांबवत आहोत, असं म्हटलं आहे. मुंबईकरांनी जर नियमांचं पालन केलं तर अशी कारवाई करणे थांबवलं जाईल, असं म्हटले आहे. (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey i.e. MumbaiKaransathi came with a special tweet.)

पोलीस आयुक्त (Police Commissioner) संजय पांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "प्रिय मुंबईकरांनो, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वांत आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवित आहोत. आपण सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा!''

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या जगजाहीर आहे. मुंबईत पार्किंगची मोठी समस्या आहे. परंतु लोक नियम पाळत नाहीत आणि ही समस्या काही सुटत नाही. . वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियम मोडणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई करतात. मुंबईमध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. वाहनधारक कळत नकळत वाहने नो पार्किंगमध्ये लावतात मग पोलीस ते टो करून घेऊन जातात. त्यानंतर लोक पोलिसांना दूषणं लावतात.

मुंबईकरांनी हा स्वतःहून नियमांचं पालन केलं तर पोलिसांवर अशी कारवाई करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे मुंबईत अशा प्रकारे वाहने उचलून नेणं काही काळासाठी थांबवत असल्याचं पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी 'CP Mumbai Police' या ट्विटर हॅण्डलवर केलेल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे. मुंबईकरांनी जर वाहतूक नियमांचे व्यवस्थित पालन केलं तर येणाऱ्या काळात प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग कायमस्वरूपी करता येईल असंही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT