मुंबई

Mumbai Crime: एअर हॉस्टेस हत्या प्रकरणाला नवे वळण, सफाई कामगाराने 'या' कारणामुळे केली हत्या

इमारतीत सफाईचं काम करणाऱ्या विक्रम आटवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईजवळील पवई याठिकाणी एका विमान कंपनीत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मरोळ इथल्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा उलगडा झाला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर चौकशीमध्ये हत्येचं कारण समोर आलं आहे.(Air Hostess Rupal Ogare Murder in Mumbai)

हत्येप्रकरणी इमारतीत सफाईच काम करणाऱ्या व्यक्तीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. मरोळ येथील राहत्या घरी तरुणीचा मृतदेह सापडला होता. तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. रूपल ओगरे (वय २३, मूळगाव रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे.

रुपल ओगरे बहीण आणि मित्रासोबत मरोळ येथील एन जी कॉम्प्लेक्स येथे राहत होती. मात्र दोघेही कामानिमित्त बाहेर असताना ही घटना घडली आहे. पोलीस तपासात रुपलच्या हत्येचं कारण समोर आलं आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

हत्येचं कारण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रुपलने इमारतीत सफाईचं काम करणाऱ्या विक्रम आटवाल याला क्लिनिंगसाठी घरी बोलावले होते. त्यावेळी रुपल घरात एकटी असल्याने आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र रुपलने विरोध केल्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुपलने विरोध केला त्यावेळी आटवालने चाकून तिच्यावर वार करत तिची हत्या केली. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

त्याचबरोबर टाईम ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरु केला. तेव्हा त्यांनी इमारतीत असलेले सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपी इमारतीत सकाळी ११.३० वाजता गेला होता. त्यानंतर दुपारी खूप वेळानंतर बाहेर पडला. सुरवातीला तो गणवेशात आत गेला आणि येताना दुसऱ्या कपड्यांमध्ये बाहेर पडाला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय खरा ठरला.

दरम्यान गुन्हा केल्यानंतर आरोपीने त्याच्या गणवेशातील रक्ताचे डाग धुतले. कपडे बदलले आणि इमारतीतून बाहेर पडला, हे पोलीस तपासात उघड झालं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT