मुंबई

लाल स्टीकर्स असणारी वाहने धावणार सुसाट; जाणून घ्या कारण

मुंबई पोलिसांनी ट्वीटर हँडलवरून दिली महत्त्वाची माहिती

विराज भागवत

मुंबई: सध्या राज्यात मिनी लॉकडाउनसदृश निर्बंध लादण्यात आले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक असल्यास आपापल्या खासजी वाहनांनी प्रवास करण्याची काही अंशी मुभा देण्या आली आहे. त्यामुळे सध्या लोकल रेल्वेतील गर्दी ही रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या टोलनाक्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने, वैद्यकीय सेवा पुरवणारी वाहने आणि रूग्णवाहिका यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई पोलीसांकडून एक स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या वाहनांची वाहतूक विनाअडथळा व्हावी यासाठी मुंबई पोलिसांकडून ग्रीन कॉरिडोर तयार केला असून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना लाल स्टीकर लावून विशेष ओळख दिली जाणार आहे.

सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि टोलनाक्यांवर ग्रीन कॉरिडोर तयार करण्याचे काम मुंबई पोलिसांकडून पूर्ण झाले आहे. गर्दीच्या वेळीदेखील विनाअडथळा वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने या कॉरिडोरचा वापर केला जाणार आहे. "अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विनाअडथळा सेवा पोहोचवणे आणि त्या सेवांची गरज असणाऱ्यांना वेळेत मदत मिळणे या दोन्ही गोष्टींचं महत्त्व आम्हाला माहिती आहे. त्यामुळे लाल स्टीकर्स असलेल्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येक रस्त्यावर एक लेन तयार करण्यात आली आहे. या लेनवरून केवळ लाल स्टीकर्स असलेल्या वाहनांना वाहतुकीची परवानगी असेल. कारण वेळेत मिळालेली मदत अनेकांचे प्राण वाचवू शकते हे अगदी खरं आहे", असं ट्वीट मुंबई पोलीसांच्या ट्वीटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांबाबत शनिवारी एक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या वाहनांची तीन भागात वर्गवारी करण्यात येणार आहे. स्टीकर्स नसलेली वाहने ही सर्वसामान्यांची असतील. डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, रूग्णवाहिका, वैद्यकीय सामानाची ने-आण करणारे आणि टेस्टिंग कीटची वाहतूक करणारी वाहने या वर्गाने वाहनांवर लाल स्टीकर्स लावायचे आहेत. तर अन्य-धान्य, फळे, किराणा माल आणि डेअरी प्रॉडक्ट्स यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी हिरव्या स्टीकर्सचा वापर करायचा आहे, असं सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT