मुंबई

Thank You मुंबई पोलिस ! गोरगरीब, झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचं मिशन भूक

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने, रोजंदारीवर काम करणा-या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरु झाल्याने, मुंबई पोलिसांनी उपाशी पोट राहणा-या तसेच गोरगरिबाना जेवण देण्यासाठी मिशन भूक सुरु केले आहे. धारावी, कुलाबा, कफ परेड पोलिस ठाण्याअंतर्गत येणा-या झोपडपट्टीतील नागरिकांची जेवणाची आणि रेशनच्या वस्तूंची सोय करण्यात आली असुन, येणा-या काळात हे मिशन संपूर्ण मुंबईभर सुरु करण्याचा मानस मुंबई पोलिसांचा आहे.

परिमंडळ 1 आणि परिमंडळ पाचच्या हद्दीमध्ये येणा-या धारावी, कफपरेड पोलिस ठाण्यात अंतर्गत येत असलेल्या आंबेडकर नगर, गणेश मूर्ती नगर या झोपडपट्टीमधील गरीब नागरीकांची गैरसोय होत होती. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी मिशन भूक हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याद्वारे जवळपास 100 नागरिकांची जेवणाची सोय केली आहे. तसेच यासाठी आणखी काही सेवाभावी संस्थेची मदत घेण्यात आली आहे. मिशन भूकअंतर्गत दररोज किमान 100 गरजूंना जेवण देण्यात येत आहे.

तसेच येत्या आठवड्यात जीवनावश्क वस्तूंचे वाटप करण्यातणार आहे. हे अन्न वाटपकरताना कमीत कमी स्टाफ नेमण्यात येतो आणि सर्व अधिकारी, कर्मचारी आपले दैनंदिन कर्तव्य बजावत असतात. तसेच येणा-या काळात हे मिशन संपूर्ण मुंबईभर सुरु करण्याचा विचार मुंबई पोलिसांचा आहे.

Mumbai police to initiate mission bhukh to provide food to poor people in lockdown extension 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor Martyrs: देशासाठी प्राणार्पण... ऑपरेशन सिंदूरमधील 'त्या' सहा शूरवीरांची ओळख अखेर उघड

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीच्या 'नो-लुक' शॉटची चर्चा;नेट्समध्ये ठोकले तुफानी षटकार, BCCI ने शेअर केला VIDEO

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये बसस्थानकावर भरदिवसा चोरीचा प्रयत्न; दोन महिला रंगेहाथ पकडल्या

Rajapur Nuclear Power Project : 'आता प्रकल्पाला विरोध कराच, समोरून काय करतो ते बघाच..'; खासदार नारायण राणेंचा अणुऊर्जा प्रकल्पावरून विरोधकांना थेट दम

Maharashtra Dahi Handi: गोविंदांसाठी खुशखबर! सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे संरक्षण, २ लाखांपर्यंत उपचार खर्च, विशेष विमा कवच लागू

SCROLL FOR NEXT