arnab goswami gets trolled after flight video kunal kamra twitter 
मुंबई

TRP Scam: अर्णब गोस्वामींचे आरोपींमध्ये नाव

आरोपपत्र केलं दाखलं.

दीनानाथ परब

मुंबई: टीआरपी घोटाळ्यात (TRP Scam) मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी आरोपींमध्ये अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या नावाचा समावेश केला आहे. अर्णब गोस्वामी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक (Republic TV Chief) आहेत. एफआयआर दाखल झाल्यानंतर नऊ महिन्यांनी आरोपपत्रात अर्णब गोस्वामी यांचे नाव घेण्यात आले आहे. (Mumbai Police Names Arnab Goswami Republic TV Chief As Accused In TRP Scam Chargesheet)

अर्णब गोस्वामी आणि ARG आऊट लायर मीडियामधील चौघांचा आरोपींमध्ये समावेश केला आहे. रिपब्लिक टीव्हीची मालकी ARG आऊट लायर मीडियाकडे आहे. पोलिसांनी कोर्टात १८०० पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

सीओओ प्रिया मुखर्जी, शिवेंदु मुळेकर आणि शिवा सुंदरम हे अन्य आरोपी आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात आतापर्यंत १५ आरोपींची नावे घेतली आहेत. यात बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकाश खानचंदानी यांच्या नावाचा समावेश आहे. फसवणूक, गुन्हेगारी कारस्थान रचणे अशा प्रकारचे आरोप केले आहेत.

२४ मार्च २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अटेकपासून मर्यादीत स्वरुपात संरक्षण दिले. अर्णब यांनी दाखल केलेल्या याचिकेत पोलीस खासकरुन तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT