Mumbai Police rescue operation 
मुंबई

Video : समुद्रात बुडणाऱ्या पर्यटक महिलेचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण!

'गेट वे ऑफ इंडिया' इथं ही महिला पर्यटनासाठी आली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : 'गेट वे ऑफ इंडिया' (Gate way of India) इथं पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटक महिलेला भर समुद्रात बुडण्यापासून कुलाबा पोलीस (Colaba Police) आणि कोस्टल पोलिसांच्या (Costal Police) सतर्कतेमुळं बचावली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पर्यटकांच्या बोटीतून समुद्र सफारी करताना ही दुर्घटना घडली. (Mumbai Police rescues drowning tourist woman Video viral)

समुद्राच्या वेगवान लाटांमुळं समुद्र सफारीसाठी असलेल्या बोटीमधून तोल जाऊन ही माहिला भर समुद्रात पडली आणि गटांगळ्या खाऊ लागली. मुंबई पोलिसांना या दुर्घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आपल्या स्पीड बोटीसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लाईफबॉयच्या मदतीनं जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्यांनी दोरखंडाच्या सहाय्यानं सुरक्षितरित्या बाहेर काढलं. दरम्यान, ही महिला कोण, कुठून आली होती? याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

दरम्यान, यापूर्वी पालघरच्या वसई भागात रणगाव बीचवर देखील काही दिवसांपूर्वी एक बोट उलटून एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला होता. तर यातील इतर पाच व्यक्तींना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, या लोकांनी समुद्रात मौजमजा करण्यासाठी बेकायदापद्धतीनं एक बोट भाड्यानं घेतली आणि ते खोल समुद्रात गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT