Sexual Harassment  sakal media
मुंबई

अंधेरीत महिला अत्याचारविरोधात महिलांसाठी कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

जोगेश्वरी : अंधेरी पोलीस ठाण्यातील (Andheri police) निर्भया पथकाने (Nirbhaya pathak) महिला व बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांवर (woman sexual harassments) प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी जनजागृती (public awareness), कायद्याचे संरक्षण आणि स्‍वसंरक्षाणासाठी (self protection) प्रात्यक्षिके या विषयावर अंधेरी जिमखाना येथे रविवार सायंकाळी कार्यशाळा (workshop) भरवली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार हसबे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक राजीव सपकाळ यांच्या उपस्थितीत निर्भया पथकाविषयी माहिती देण्यात आली. शिवाय महिला व बालकांवर होणारे अत्याचार, घरगुती हिंसाचार व ते कमी करण्यासाठी पोलिस व कायद्याची भूमिका, मुलींसाठी ‘गूड टच, बॅड टच’विषयी माहिती देऊन बालकांचे लैंगिक शोषण होऊ नये, म्हणून त्यांना सतर्क करण्यासाठी मार्गदर्शन केले.

या वेळी स्पर्श व कोमल हे लघुपट दाखविण्यात आले. मुलींना व महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून करून घेण्यात आली. सोशल मीडियावर ओळख करून होणारी फसवणूक, अश्लील फोन कॉल्स व धमकी याविषयी सतर्क कसे राहावे, प्रवासादरम्यान घ्यावयाची दक्षता, विशेषतः रात्रीच्या वेळी रिक्षा, टॅक्सी, बसने प्रवास करतेवेळी त्यांचे लोकेशन व वाहन क्रमांक नोंद करून जवळच्या नातेवाईकांना माहिती देण्‍याचा बहुमोल सल्ला निर्भया पथक अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दीपाली घोगरे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

त्या चर्चा खऱ्या ठरल्या! अद्वैत- कलाची जोडी तुटणार; ईशा 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडणार, प्रोमो पाहून चाहते रडकुंडीला

SCROLL FOR NEXT